'हिरोपंती' या सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन (Kriti Sanon). २०१४ मध्ये इंडस्ट्रीत येणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे कोणतीही फिल्मी बँकग्राऊंड नसतानाही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, आऊटसायडर असल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात तिच्या करिअरवर कसा परिणाम झाला हे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सध्या सोशल मीडियावर क्रितीची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने नेपोटिझ्म, स्टारकिड्स यांच्यावर भाष्य केलं आहे. एका स्टारकिडसाठी तिला सिनेमातून रिप्लेस केलं होतं, असंही तिने यावेळी सांगितलं.
"मी खूप महत्त्वाकांक्षी आहे. माझ्यात चांगलं काम करायची क्षमता आहे हे मला ठावूक आहे. मला काही ए-लिस्ट डायरेक्टर्ससोबत काम करायचं आहे. आतापर्यंत मला काही चांगल्या संधीही मिळाल्या. पण, इतरांशी तुलना करायची झाली. तर,आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला खऱ्या आयुष्यात हव्या आहेत. पण, त्यासाठी खूप मोठं अंतर पार करायचं आहे. आणि, दिग्दर्शकांकडे पोहोचायला त्यांच्याकडे काम मागायला मला कमीपणा वाटत नाही", असं क्रिती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जर मी एखाद्या फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून आले असते. तर कदाचित मला कामासाठी हात पसरायची वेळ आली नसती. माझी लोकांशी आधीच ओळख झाली असती. कुठे ना कुठे आम्ही भेटलो असतो.पण, एका पॉईंटनंतर हे सगळं नाही तर तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होते. मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. पण, फिल्मी कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तीनेच मला एका सिनेमात रिप्लेस केलं होतं. आणि, असं बऱ्याचदा झालंय. त्याचा त्रासही होतो. वाईट वाटतं. पण, तुम्ही काही करु शकत नाही. यश किंवा अपयशात प्रत्येकाचा स्वतःचा वाटा असतो."