अभिनेत्री माही गिल देव डी, साहेब बीवी और गुलाम आणि नॉट ए लव स्टोरी या चित्रपटांमधील बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिच्या बोल्ड भूमिका व अंदाजामुळे तिचे चित्रपट चर्चेत असतात. एका मुलाखतीत माही गिल हिने खुलासा केला होता. तिने सांगितले होते की ती बऱ्याच कालावधीपासून लिव इन रिलेशनशीपमध्ये आहे आणि तिला एक मुलगी देखील आहे.
एका मुलाखतीत माही गिलने तिच्या रिलेशनशीप व पर्सनल लाइफबद्दल सांगितले होते. तिने सांगितले होते की, मी विवाहित नाही. पण, माझा बॉयफ्रेंड आहे.
तिने पुढे सांगितले होते की, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण लग्न केले किंवा नाही केले त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. मला आझादी व स्पेस या दोन्ही गोष्टींची गरज आहे. आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो. हो. आम्ही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहतो आहे. लग्न देखील लवकरच करू.
माहीने तिला तीन वर्षांची मुलगी असल्याचे सांगितले होते. पण तिने ती मुलगी दत्तक घेतलीय की तिला जन्म दिला हे सांगितले नाही. तिचं नाव वेरोनिका आहे. माहीने तिच्याबद्दल सांगितलं की, माझी मुलगी माझ्यासोबत राहते. माझी आंटी तिची काळजी घेते. मीदेखील कामाच्यावेळी मुंबईतच राहण्याचा प्रयत्न करते.
माही गिल नुकतीच दूरदर्शन सिनेमात झळकली होती. याशिवाय फिक्सर व पोषम पा या वेबसीरिजमध्ये ती झळकली.