Join us

'हाय आंटी' ऐकताच माधुरी झाली थक्क; चारचौघात चाहत्याने 'धकधक गर्ल' मारली आंटी म्हणून हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:58 IST

Madhuri dixit: माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षित (madhuri dixit) हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर तिच्या अनेक सुपरहिट सिनेमांची लिस्ट येते. 'हम आपके है कौन', 'दिल तो पागल हैं', 'देवदास', 'आ जा नचले', 'खलनायक', 'तेजाब' असे कितीतरी सिनेमा तिचे सुपरहिट झाले. उत्तम अभिनयासह माधुरी तिच्या नृत्यकौशल्यामुळेही लोकप्रिय आहे. माधुरीच्या सौंदर्याची आजही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. मात्र, सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका चिमुकल्याने चक्क तिला सगळ्यांसमोर आंटी म्हणून हाक मारली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

विरल भय्यानी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माधुरीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या सेटवरचा आहे. शोसाठी माधुरी तयार होऊन तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेरुन सेटकडे जात होती. यावेळी तिला पाहिल्यावर चाहत्यांनी तिच्याभोवती गराडा घालता. यामध्येच एका महिलेने चक्क तिच्या मुलाला माधुरीला आंटी म्हण असं सांगितलं. आणि, या चिमुकल्यानेही तिला आंटी म्हणून हाक मारली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माधुरीला पाहिल्यावर पापाराझी तिचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. यामध्येच एक महिला अचानक येते आणि 'माझ्या मुलाला तुम्हाला भेटायचंय', असं सांगते. त्यावर, माधुरी सुद्धा त्या मुलाला पाहून हाय म्हणते. त्यावर, हाय करो आंटी को हाय करो', असं ती महिला तिच्या मुलाला सांगते.

दरम्यान, माधुरीला आंटी म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया एकदम उंचावतात. इतकंच नाही तर सगळ्यांसमोर हा चिमुकला आंटी बोलल्यामुळे माधुरीला सुद्धा हसू येतं. माधुरी कायम तिच्या ग्लॅमरस लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत येत असते. या व्हिडीओमध्येही तिने ब्लॅक कलरचा लेहंगा परिधान केला होता.यावर पिंक रंगाचं वर्क केलं होतं.

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन