Join us

"लोकांना नाही म्हणण्याची वेळ आली आहे", अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 11:22 AM

अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

Malaika Arora: सध्या बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपबद्दल जोरदार चर्चा आहे. त्यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. गेल्या काही काळापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते एकत्र स्पॉटही झाले आहेत. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. अलिकडेच अर्जुन कपूरने त्यांच्या नात्यावर मौनं सोडलं. अभिनेत्याने ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे. अशातच मलाया अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेली क्रिप्टिक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मलायका अरोराने स्वत च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट पाहून अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत. या पोस्टमध्ये लिहलंय की, 'NO' vember A time to start Saying 'No' to people, Place and things that drain our energy" मलायकाने या पोस्टद्वारे ब्रेकअप संदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

दरम्यान, मलायका आणि अर्जुन कपूर २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते. जवळपास सहा वर्ष ते दोघे रिलेशिपमध्ये होते. त्यांनी २०१९ मध्ये त्यांचं नातं अधिकृत केले आणि तेव्हापासून ते सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. दोघांनी त्यांचं नातं लपवून ठेवलं नव्हतं. ते एकमेकांबरोबरचे व्हेकेशनचे फोटो शेअर करायचे. अर्जुनही मलायकाबरोबरच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलायचा, मात्र मागील काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. अखेर हे नातं संपल्याचं अर्जुननेच सांगितलं आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी