Mallika Sherawat: अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात मल्लिका राजकुमार रावच्या बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे .बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्री या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पुन्हा कमबॅक करत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान मल्लिका शेरावत वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे.
नुकतीच अभिनेत्रीने'हाउटरफ्लाय' या मीडिया चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मल्लिकाने तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला. तेव्हा अभिनेत्रीने म्हणाली, "हरयाणात माझा जन्म झाला तेव्हा लहाणपणी मल काही वाईट अनुभव आले. त्यावेळी मला कोणीच पाठिंबा दिला नाही. आई-वडील या दोघांपैकी मला कोणीच समजून घेतलं नाही. माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. इतर लोकांप्रमाणे त्यांनी पितृसत्ता विचारधारा कायम ठेवली".
पुढे मल्लिकाने म्हटलं, "त्यावेळी या गोष्टी मला कळतंच नव्हत्या. पण, आता सगळं समजतंय. तेव्हा माझा भाऊ आणि मी आमच्या दोघांमध्ये भेदभाव केला जायचा. शिवाय आई-बाबा म्हणायचे, तो मुलगा आहे त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवावं लागेलं. त्याला शिकवा, त्यासाठी पैसे लावा. सगळी संपत्ती ही त्याचीच आहे. पुढे हे सगळं त्याचा जो वारसदार असेल त्याला मिळेल. मुलींचं काय त्या लग्न करून दुसऱ्या घरी जातील तोपर्यंत आई-वडिलांवर त्याचं ओझं बनून राहतात, असे घरचे म्हणायचे".
आई डिप्रेशनमध्ये गेली असावी-
"माझा जन्म झाल्यानंतर घरातील सगळे नाराज झाले होते. वडिलांनी मला सगळं काही दिलं,चांगलं शिक्षणही दिलं पण, वैचारिक स्वातंत्र्य मला नव्हतं. त्यांनी माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. असं असूनही मी बरेचसे खेळ लपून खेळायचे, कारण मला तेही करण्याची परवानगी नसायची. त्यामुळे असं केल्याने माझ्यासोबत कोणी लग्न करायला तयार होणार नाही, असं सांगितलं जायचं. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा कोणालाच आनंद झाला नव्हता. मला तर वाटतं या सगळ्या कारणांमुळे माझ्या आईला डिप्रेशनचा सामना करावा लागला असेल". असा खुलासा मल्लिका शेरावतने मुलाखतीत केला.