Join us

Mamta kulkarni: टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीने धरला अध्यात्माचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:22 AM

Mamta kulkarni: संपूर्ण आयुष्य वादात गेलेल्या या अभिनेत्रीचे संबंध अंडवर्ल्डशीदेखील होते असं म्हटलं जातं.

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta kulkarni) हिने ९० चा काळ गाजवला. अभिनयापेक्षा ममताच्या सौंदर्याची आणि बोल्डनेसची सर्वाधिक चर्चा रंगली. आपला दिलखेचक अदांमुळे चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या ममतांचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशी दोन्ही आयुष्य प्रचंड वादात राहिली.  विशेष म्हणजे संपूर्ण आयुष्य वादंगात राहिल्यानंतर अखेर या अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग धरला. त्यामुळे आता ही अभिनेत्री नेमकं काय करते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

1993 मध्ये केलं टॉपलेस फोटोशूट

1993 मध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ममता कुलकर्णीने टॉपलेस फोटोशूट केलं. स्टारडस्ट या मासिकासाठी ममता टॉपलेस झाली. विशेष म्हणजे या फोटोशूटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जवळपास १५ हजार रुपयांच्या जामिनावर तिची सुटका झाली होती.

अंडरवर्ल्डशी होते संबंध

ममता कुलकर्णी हिचं नाव कुख्यात डॉन छोटा राजन याच्यासोबत जोडलं गेलं होतं. ममताला सिनेमात घेण्यासाठी छोटा राजन दिग्दर्शकांना धमकीचे फोन करायचा. छोटा राजननंतर तिचं नाव ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं. ममताने विकी गोस्वामीसोबत २००२ साली लग्न केलं. त्यानंतर ती केनियाला स्थायिक झाली.

सध्या जगतीये साध्वीचं जीवन

संपूर्ण आयुष्य वादात राहिल्यानंतर ममताने अध्यात्माचा मार्ग अवलंबला. सध्या ती साध्वीचं आयुष्य जगत आहे. ममताने तिचा जीवनप्रवास ऑटोबायोग्राफी बाय योगिनी याच्यात लिहिला आहे. 

टॅग्स :ममता कुलकर्णीसेलिब्रिटीबॉलिवूड