Join us

तब्बल ११ तास सर्जरी अन् असह्य वेदना, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने कॅन्सरवर केली यशस्वीरित्या मात; म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 10:20 AM

कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर या बॉलिवूड अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक केलं.

Manisha Koirala : कॅन्सरसारख्या आजारावर मात करणं म्हणजे हा नवा जन्मच म्हणावा लागेल. बॉलिवूडमधील (Bollywood) बऱ्याच कलाकारांनी या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात केली. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झालं आणि ती पूर्णपणे खचून गेली. असं असातानाही तिने योग्य वेळी उपचार घेतल्यानंतर या गंभीर आजारावर मात केली. ही अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला (Manisha Koirala) आहे.

कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर काही वर्षांनी मनिषाने कमबॅक केले. 'डियर माया','लस्ट स्टोरी','संजू,'प्रस्थानम' यासारख्या सिनेमात काम केले. 'संजू' सिनेमात तिने रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'हीरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तिने साकारलेलं 'मल्लिकाजान' हे पात्र लोकांना भावलं. अशातच नुकतीच मनिषा कोईराला एएनआय सोबत बातचीत केली. त्यादरम्यान मनिषाने ओव्हेरियन कॅन्सरबद्दल भाष्य केलं. 

या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "मला आठवतंय मी त्यावेळी पूर्णपणे खचले होते. काहीच सूचत नव्हतं,निराश झाले होते. त्यातच शरीराला वेदना जाणवत होत्या. २०१२ मध्ये मला ओव्हेरियन कॅन्सर असल्याचं समजलं. तेव्हा मी नेपाळमध्ये होते आणि खूपच घाबरले होते. त्यावेळी मी जसलोक हॉस्पिलटमधील बड्या डॉक्टरांशी बोलले. पण, तेव्हा मी मरणार आहे आणि हा माझा अंत आहे असं मला वाटलं. मी खूपच घाबरले होते."

तब्बल ११ तास सर्जरी झाली

पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी कॅन्सरवरील उपचारासाठी ५ते ६ महिने न्यूयॉर्कमध्ये राहिले. तिथे तब्बल ११ तास माझी सर्जरी करण्यात आली. खरंतर, तिथल्या डॉक्टरांनी मला खूप मदत केली. त्यानंतर मी बरी झाले."

टॅग्स :मनिषा कोईरालाबॉलिवूडसेलिब्रिटी