Join us

नवऱ्याने इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्री व्हायची नाराज; थेट निर्मातीसोबत घेतलेला पंगा, काय होतं प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 17:51 IST

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नीलम कोठारी (Neelam Kothari)अव्वल स्थानावर होती.

Neelam Kothari: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नीलम कोठारी (Neelam Kothari) अव्वल स्थानावर होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना भुरळ घातली. नीलमच्या चित्रपटांची आजही क्रेझ पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये तिची आणि गोविंदाची जोडी तुफान गाजली. इतकी की, या जोडीला साईन करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू असायची. परंतु अभिनेत्री लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीतून गायब झाली. नीलमने २००० साली ऋषि सेठियासोबत लग्नगाठ बांधली होती. पण, तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तिने अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केलं. त्यावेळी  नीलम तिच्या नवऱ्याचा बाबतीत पजेसिव होती. एका प्रोजेक्टदरम्यान तिच्या नवऱ्याने इंटिमेट सीन केल्यामुळे अभिनेत्रीने थेट निर्माती एकता कपूर सोबत पंगा घेतला होता. याचा खुलासा तिने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये केला. 

नेटफ्लिक्सवरील 'फॅब्युलस लाईफ्ज व्हर्सेस बॉलिवूड वाईव्ह्ज' या शोचा नवीन सीजन नुकताच आला आहे. यातील एका एपिसोडमध्ये नीलमने एकता कपूर आणि तिच्यामध्ये झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मला माहित नव्हतं की ते सीन कसे होते, एकता कपूर त्या शोची निर्माती होती. जेव्हा समीरने केलेले ते सीन्स पाहिले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. त्यावरून मी आणि एकता जवळपास ३-४ महिने बोलत नव्हतो. शिवाय आमच्यामध्ये वाद निर्माण झाले होते."

पुढे अभिनेत्रीने म्हणाली की, "मी एकताला याबद्दल विचारलं की तू माझ्या नवऱ्याला असं काम करायला कसं सांगू शकतेस? त्यावर  एकता उत्तर देत म्हणाली होती की, तुझ्या नवऱ्याने तो सीन करण्यापूर्वी स्क्रिप्ट वाचली नव्हती का? त्यानंतर मी या गोष्टीचा विचार केला, थोड्या कालावधीनंतर माझ्या डोक्यातील राग थोडा कमी झाला." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

टॅग्स :बॉलिवूडएकता कपूरसेलिब्रिटी