बॉलिवूडची ही अभिनेत्री करते सेंद्रीय शेती,पहिल्या सिनेमातील हिरोपासून मिळाली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 7:36 AM
अभिनयासह सेलिब्रिटी मंडळी सध्या स्वतःला समाज कार्यात झोकून देत आहेत.अभिनयाला रसिक जितकी पसंती देतात किंबहुना त्याहून अधिक लोकप्रियता आणि ...
अभिनयासह सेलिब्रिटी मंडळी सध्या स्वतःला समाज कार्यात झोकून देत आहेत.अभिनयाला रसिक जितकी पसंती देतात किंबहुना त्याहून अधिक लोकप्रियता आणि प्रेम या कलाकार मंडळींना या समाज कार्यातून मिळते.अक्षयकुमार, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, आमिर खान यासारखे बरेच कलाकार सामाजिक कार्यात झोकून कार्यरत आहेत. बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री अभिनयासह एक हटके काम करत आहे.या अभिनेत्रीचे नाव आहे जुही चावला.गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही मोबाईल टॉवर्समधून निघणा-या धोकादायक लहरींविरोधात जनजागृती करत आहे.याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सेंद्रीय शेती करत आहे.याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत आहे.नुकतेच वुमेन ऑफ इंडिया ऑर्गेनिक फेस्टिवल कार्यक्रमात जुही चावलाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली.पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते.जुहीचे वडील शेतकरी होते.त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली.मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.मात्र वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं.त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.(Also Read:संपदा कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी यांनी असे निर्माण केले 'आनंदाचे शेत') cnxoldfiles/face and learnt a harsh lesson .. So TODAY trashing the chemicals and embracing the BEST beauty kit ever !!!!'.