रश्मिकापूर्वी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती 'अॅनिमल' ची ऑफर; खुलासा करत म्हणाली- "मला पश्चाताप..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 11:36 AM2024-12-09T11:36:57+5:302024-12-09T11:38:14+5:30
परिणीती चोप्राने नकार दिल्यामुळे रश्मिकाच्या पदरी पडला 'अॅनिमल', अभिनेत्री स्वत: च खुलासा करत म्हणाली....
Parineeti Chopra On Animal Movie: संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटाची बॉलीवूड इंडस्ट्रीत जोरदार रंगली. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका (Rashmika Mamdanna), तृप्ती डिमरी (Tripti Dirmri) हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. गतवर्षी १ डिसेंबर २०२३ या दिवशी 'अॅनिमल' चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाने बॉक्स ऑफिस अनेक रेकॉर्ड्स मोडले. 'अॅनिमल' मधील कलाकार त्यासोबतच त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला. या चित्रपटाने दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना रणबीर कपूरच्या म्हणजेच (रणविजयच्या) पत्नीची भूमिका साकारली होती. रश्मिकाने सुद्धा उत्तमरित्या तिची भूमिका वठवली. पण, खरंतर हा रोल रश्मिका मंदानाला नाही तर पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राला ऑफर करण्यात आला होता.
परिणीती चोप्राने नुकतीच रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत'मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान परिणीतीने अनेक खुलासे केले. 'अॅनिमल' साठी दिग्दर्शक संदीप रेडी वांगा यांनी रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री परिणीती चोप्राच्या नावाला पसंती दिली होती. रश्मिका मंदानापूर्वी या चित्रपटासाठी परिणीतीला ऑफर देण्यात आली होती. परंतु आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे परिणीती चोप्राने ऑफर नाकारली. त्यावेळी अभिनेत्री 'चमकीला' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे 'अॅनिमल' मध्ये रश्मिका मंदानाला कास्ट करण्यात आलं. त्यामुळे रश्मिकाच्या लोकप्रियतेत सुद्धा कमालीची वाढ झाली.
'आप की अदालत'मध्ये अभिनेत्री म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर देवाच्या मनात काही वेगळंच होतं. मी त्यावेळी 'अॅनिमल' चा भाग होणार होते, सगळं काही सुरळीत चालू होतं. पण त्याचदरम्यान मला 'चमकीला'मध्ये काम करण्याची संधी मिळाली."
पुढे अभिनेत्री म्हणाली," मग त्यावेळी मी 'चमकीला' करण्याचं ठरवलं. 'चमकीला'मुळे मला चाहत्यांचं प्रेम, सपोर्ट आणि एक वेगळीच ओळख मिळाली. त्यामुळे मी 'अॅनिमल'न केल्याचा मला पश्चाताप होत नाही. मी खुश आहे."