Poonam Dhillon: बॉलिवूडचं (Bollywood) ग्लॅमरस विश्व तसेच या कलाकारांची जगभर चर्चा होताना दिसते. त्यांच्या लग्झरी लाइफस्टाईलसह प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना उत्सुकता असते. त्यातील कलाकारांची महत्वाची गरज म्हणजे व्हॅनिटी वॅन. चला तर जाणून घेऊया व्हॅनिटी व्हॅन्सची आवश्यकता का भासली? आणि त्याची सुरुवात कशी झाली?
९० च्या दशकात सेलिब्रिटींना खास करून अभिनेत्रींची कामाच्या ठिकाणी प्रचंड गैरसोय व्हायची. बॉलिवूड अभिनेत्रींना आऊटडोर शूटिंगदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. मेकअप करण्याबरोबरच कपडे बदलण्यासाठी त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं होतं. या गंभीर समस्येवर या बॉलिवूड अभिनेत्रीने कायमस्वरूपी तोडगा काढला. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना कामाच्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनची सुविधा असावी याची संकल्पना अभिनेत्री पुनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांची होती.
या अभिनेत्रीची होती व्हॅनिटी वॅनची संकल्पना
पुनम ढिल्लो त्यांच्या एका प्रोजेक्टदरम्यान परदेशात गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांना लॉस एंजेलिसला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांची एक मैत्रीण भेटली. ती भेट एका सिनेमाच्या शूटिंगच्या सेटवर झाली आणि तिथेच त्याने व्हॅनिटी व्हॅन पहिल्यांदा पाहिली. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन पाहून त्या खूप प्रभावित झाली आणि त्यांनी ही संकल्पना भारतात आणली. त्यामुळे आऊटडोर शूटिंग करताना त्याचा फायदा अभिनेत्रींना होऊ शकतो असं त्यांना वाटलं. १९९१ मध्ये पुनम यांनी एका कंपनीसोबत करार केला आणि जवळपास २५ व्हॅनिटी व्हॅन लॉन्च केल्या. आज जवळपास सगळ्याच बॉलिवूड कलाकारांकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहेत.
भारतात व्हॅनिटी व्हॅन लॉन्च करण्यात आली परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांना ही कल्पना काही आवडली नव्हती. कारण त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होणार होती. त्यानंतर इंडस्ट्रीत व्हॅनिटी व्हॅनचा ट्रेंड वाढत गेला. बॉलिवूडमध्ये अभिनेते अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी पहिल्यांदा व्हॅनिटी व्हॅनचा वापर केल्याचं सांगण्यात येतं.
वर्कफ्रंट
अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी १९७८ मध्ये 'मिस यंग इंडिया' चा खिताब पटकावला. यानंतर यश चोप्रांनी 'त्रिशूल' सिनेमात त्यांना ब्रेक दिला. या फिल्ममुळे पूनम ढिल्लो रातोरात स्टार झाल्या. पूनम ढिल्लो यांनी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले.'त्रिशूल','काला पत्थर','नुरी' हे त्यातील काही सर्वात जास्त गाजलेले चित्रपट आहेत.