Join us

'छत्रीवाली' म्हणजे काय रे भाऊ? दिग्दर्शकांनीच सांगितला नावामागचा अर्थ

By शर्वरी जोशी | Published: January 10, 2022 4:30 PM

Chhatriwali :प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिच्या हातात कंडोमचं पाकिट असल्याचं पाहायला मिळालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'छत्रीवाली' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिच्या हातात कंडोमचं पाकिट असल्याचं पाहायला मिळालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. यात खासकरुन अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर छत्रीवाली म्हणजे नेमकं काय? या चित्रपटाची कथा काय असेल किंवा चित्रपटाला हे नाव देण्यामागचं नेमका कारण काय असे अनेक प्रश्न सर्च केले. मात्र,  चित्रपटाच्या या नावामागील अर्थ चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर (Tejas Vijay Deoskar) यांनी दिलं आहे. अलिकडेच त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

"चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि एक सॉफ्ट कॉल किंवा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला. तो सॉफ्ट कॉल लोकांपर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा होती. कारण, घरात सर्वसाधारणपणे या विषयावर कोणीही बोलत नाही. पण, त्याविषयावर चर्चा करणं अत्यंत आवश्यक असतं. या चित्रपटातून कोणताही चुकीचा संदेश देण्यात आलेला नाही. उलटपक्षी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा चित्रपट पाहू शकतात," असं दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणाले.

दरम्यान, या चित्रपटामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून यावेळचे काही फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तर, तेजस देऊस्कर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांना 'बाबा', 'बकेट लिस्ट', 'प्रेमसूत्र' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. तेजस हे उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच एक लेखक आणि अभिनेतादेखील आहेत. 

टॅग्स :रकुल प्रीत सिंगबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी