Join us  

राणी मुखर्जी आणि काजोलच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 9:46 AM

राणी मुखर्जी आणि काजोलचा भाऊ असलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केलीय

 

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. राणी मुखर्जी आणि काजोलचा चुलत भाऊ आणि सुप्रसिद्ध बंगाली अभिनेता सम्राट मुखर्जीला पोलिसांनी अटक केलीय. कोलकातामधून सम्राटला पोलिसांनी अटक केली असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पश्चिम कोलकाता येथे काल अपघात झाला. त्यावेळी सम्राटने त्याची गाडी एका बाईकस्वाराला ठोकली. या घटनेमुळे सम्राटला अटक करण्यात आलीय 

सम्राट मुखर्जीने केला अपघात, नेमकं प्रकरण काय?

 PTI च्या अनुसार, बेहाला येथील विद्यासागर कॉलनीमधील २९ वर्षीय बाईकस्वारासोबत ही दुर्घटना झाली. रात्री १२.३० वाजता बाईकस्वार हा घरी परतत होता. त्यावेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या सम्राटने बाईकस्वाराला धडक दिली. त्यामुळे बाईकस्वार बेशुद्ध झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, सम्राट हा टॉलीगंज येथे जात असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे हा अपघात झाला.

घराबाहेरच्या भिंतीवर कार आदळली

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार सम्राटने बाईकस्वाराला धडक दिल्यानंतर त्याची कार जवळच असलेल्या घराच्या भिंतीवर आदळली. त्यामुळे भिंतीलाही तडे गेले. दरम्यान पोलिसांनी सम्राटला अटक केली असून त्याची मेडिकल तपासणी होणार आहे. सम्राट सुद्धा लोकप्रिय अभिनेता असून त्याने  'भाई भाई', 'ज़ंजीर', 'हम हैं राही कार के', 'राम और श्याम' अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय. सम्राट हा काजोल आणि राणीचा चुलत भाऊ आहेच शिवाय 'ब्रम्हास्त्र' फेम दिग्दर्शक अयान मुखर्जीचाही तो नात्याने चुलत भाऊ लागतो.

टॅग्स :राणी मुखर्जीकाजोलबॉलिवूडअपघात