Join us

श्री रवी टंडन चौक! मुंबईतील रस्त्याला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव, अभिनेत्रीने केलं उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:47 IST

सध्या अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

Raveena Tandon : बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे  रवीना टंडन. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रवीनाने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. एकामागोमाग बॉलिवूडला सुपरहिट सिनेमे देत तिने चाहत्यांच मनोरंजन केलं. 

सध्या अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आज बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. याचं कारणंही तितंकच खास आहे. अभिनेत्रीनं मुंबईतील जुहू येथे वडील रवी टंडन यांच्या नावानं एका चौकाचे उद्घाटन केलं आहे.

दरम्यान, रवी टंडन चौकाच्या उद्घाटन सोहळ्यात रवीना, तिची आई आणि मुलगी राशा यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. रवीनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत चाहत्यांना माहीती दिली आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते आणि काही सेलिब्रिटी तिच्या कामाचं कौतुकही करत आहेत. 

या व्हिडीओवर 'हॅप्पी बर्थडे पापा, रवी टंडन चौक 17 फेब्रुवारी 2024.''असं कॅप्शन अभिनेत्रीने दिलंय. तसंच व्हिडओमध्ये रवीना, तिची आई आणि मुलगी यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकजण या व्हिडिओमध्ये आनंदी दिसत आहेत

वडिलांच्या नावाने चौक :

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक रवी टंडन यांचा १७ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. साधारणत: ११ फेब्रुवारी २०२२ रोजी रवीनाचे वडील रवी टंडन यांचं श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं होतं. आता रवीनानं वडिलांना वाढदिवसानिमित्त ही खास भेट दिली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, मुंबईतील जुहू येथे दिवंगत रवी टंडन यांच्या नावाने एक चौक बांधण्यात आला, ज्याचे अनावरण रवीना टंडनने स्वतः केलं. 

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूड