सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.
संघर्ष हा रेखा यांच्या जीवनात बालपणापासूनच होता. मात्र प्रत्येक परिस्थितीवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. त्यांच्या सुरुवातीच्या सावळ्या लूकमुळे निर्माते त्यांना संधी द्यायला तयार नव्हते. मात्र तरीही रेखा यांनी हार मानली नाही. स्वतःमध्ये बदल घडवत त्यांनी दो अंजाने सिनेमातून दमदार एंट्री केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री ते बॉलीवुड दिवा असा थक्क करणारा प्रवास केला. रेखा यांनी बॉलीवुडमध्ये जे स्थान मिळवलं आहे ते कुणीच मिळवू शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेखा यांनी सिनेमात काम केलेले नाही. असं असलं तरी त्याचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. सिनेमांशिवाय दक्षिण भारतात त्यांची दोन घरं असून त्याचं भाडेरुपात रेखा यांना उत्पन्न मिळतं.
रेखा या राज्यसभा खासदार होत्या. खासदारांना त्यांचं वेतन मिळत असतं. ते वेतन रेखा यांनाही मिळालं. तसेच बालपणापासून संघर्ष केला असल्यानं त्यांना बचतीचे महत्त्वही नक्कीच माहिती असेल. आयुष्यभरातील कमाईतून त्यांनी नक्कीच काही ना काही बचत केली असणार. याशिवाय पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं गलेलठ्ठ मानधन रेखा यांना मिळतं. रेखा या अनेक राज्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्या बिहारच्या ब्रँड अॅम्बेसेडर होत्या. त्याचेही रेखा यांना मानधन मिळतं. त्यामुळंच बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून रेखा यांची गणना होते.