Join us

अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 08:46 IST

अभिनेत्री सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली माहिती.

Sana Khan Baby: सना खान (Sana Khan) हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आहे. बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने कलाविश्वापासून दूर राहणं पसंत केलंय. परंतु सना खान सध्या चर्चेत आली आहे. याचं कारण सुद्धा तितकंच खास आहे. सनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट करत सना खानने तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केल्याची पाहायला मिळतेय.

नुकतीच सना खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड खुश झाले आहेत. सना खाने २०२० मध्ये अनस सय्यदसोबत लग्न केलं आणि परदेशात स्थायिक झाली. त्यानंतर लग्नाच्या तीन वर्षानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता पुन्हा दुसऱ्यांदा सना-अनस आई-बाबा झाले आहे. 

सना खान एकेकाळी मनोरंजन जगतातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा होता. 'बिग बॉस-६' मध्येही ती झळकली होती. याशिवाय अभिनेत्रीने मालिका, चित्रपट आणि ओटीटी अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. 'टॉयलेट एक प्रेम कथा' चित्रपटात केमिओ व्यतिरिक्त 'स्पेशल ऑप्स'मध्ये तिने केलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. परंतु २०२०मध्ये तिने अचानक सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

टॅग्स :सना खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया