Join us  

अभिनेत्रीसोबत लिपलॉक किंसींग अन् ट्रोल झाली अॅक्ट्रेस; मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:20 PM

अभिनेत्रीने चित्रपटात केलेल्या एका किसींग सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Shabana Azmi Birthday शबाना आजमी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत.  आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ७४ वर्षीय अभिनेत्री शबाना आजमी यांचा आज वाढदिवस आहे. यंदा शबाना आजमी आपला वाढदिवस परदेशात साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल...

शबाना आजमी यांना आपण अतिशय प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखतो. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी गाजली होती. आपल्या सहज, सुंदर अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण, २८ वर्षापूर्वी आलेल्या एका चित्रपटामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावेळी शबाना आजमी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

नेमकं काय होतं प्रकरण? 

१९९६ मध्ये आलेल्या 'फायर' चित्रपटामध्ये शबाना आजमी यांनी नंदिता दास यांच्यासोबत लिपलॉक किंसींग केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. चित्रपटातील त्या सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी चित्रपटांमध्ये असे सीन्स दाखवणं म्हणजे वादाला तोंड फुटणार हे नक्की होतं. संपूर्ण मनोरंजन विश्वात 'फायर' चर्चेच्या केंद्रस्थानी होता. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते दीपा मेहता यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शबाना आजमी यांच्या 'फायर' चित्रपटाला जगभरातून मोठी पसंती मिळाली. परंतु, भारतात या चित्रपटातील किंसींग सीनमुळे मोठे वाद निर्माण झाले. एका घरातील दोन सुनांवर आधारित हा सिनेमा आहे. एका हिंदू परिवारातील दोन जावांमधील समलैंगिक संबंध यामध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला. 

अभिनेत्रीला मिळाली जीवे मारण्याची धमकी-

मीडिया रिपोर्टनुसार, फायर चित्रपट त्यातील सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा परिणाम असा झाला की, अभिनेत्री शबाना आजमी आणि नंदिता दास यांच्यासह निर्माते दीपा मेहता यांना प्रेक्षकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं. सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला खरा पण, त्याला अनेकांनी विरोध दर्शवला. या चित्रपटामुळे समाजात एक चुकीचा संदेश दिला जात आहे, असं काहींचं म्हणणं होतं. 

टॅग्स :शबाना आझमीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया