Sonali Bendre:बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ९० च्या दशकातील लोकप्रिय नायिकांपैकी एक होती. सोनालीने बऱ्याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. अभिनेत्री करिअरमध्ये बऱ्याच नावाजलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली. दरम्यान, सोनाली अभिनेता सुनील शेट्टीसोबत (Suniel Shetty) 'सपूत', 'रक्षक' आणि 'टक्कर' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडली. त्यानंतर सोनाली आणि सुनील शेट्टी एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यानंतर सोनाली आणि सुनील शेट्टी यांच्या अफेयर्सच्या चर्चा जोर धरू लागल्या. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. याबाबत सोनाली बेंद्रेने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने 'News18 Showsha' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीसोबत अफेयर्सच्या चर्चाचं खंडण करत त्या अफवांना पूर्णविराम दिला होता. त्यावेळी अभिनेत्रीने सांगितलं की, "या अफवांमुळे मी आणि सुनील टेन्शमध्ये आलो होतो. सुरुवातीला चर्चा ऐकून आम्ही देखील खूप हसलो. पण, याचा परिणाम आमच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला. मला कल्पना नाही की अफेयर्सच्या खोट्या चर्चांमुळे सुनीलला काही फरक पडला असेल की नाही. परंतु माझ्यासोबत त्यावेळी जे घडलं त्याबद्दल मी सांगू शकते. मी त्यावेळेस सिंगल होते त्यामुळे कोणाला उत्तर द्यावं असं मला वाटत नव्हतं, पण सुनीलचं लग्न झालं होतं."
पुढे सोनाली म्हणाली, "लोकांना या गोष्टी समजतच नाही. त्यावेळेस एके दिवशी मध्यरात्री २ वाजता कोणीही अज्ञात माणूस तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की मी सुनील शेट्टी बोलतोय. माझ्यासोबत लग्न कर. या एका फोनमुळे मी प्रचंड घाबरले होते. मग मी हा घडलेला सगळा प्रकार सुनीलला सांगितला. त्यामुळे तो देखील स्ट्रेसमध्ये आला होता. "
दरम्यान, सोनाली बेद्रेंचं गोल्डी बहल यांच्यासोबत झालं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे. सोनाली तिच्या संसारात रमली आहे.