Raanjhanaa Movie : मागील काही दिवसांपासून ९० च्या काळात प्रदर्शित झालेले बॉलीवूडसह अनेक साऊथ सिनेमे पुन्हा एकदा प्रदर्शित केले जात आहेत. या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील थिएटमध्ये तोबा गर्दी करताना दिसत आहेत. त्यात आता दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (sonam Kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला 'रांझणा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१३ मध्ये हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. आनंद एल. राय दिग्दर्शित रांझणा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु 'रांझणा'ची क्रेझ लोकांच्या मनात अजूनही कायम आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेला हा चित्रपट लवकरच पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रांझणा' हा रोमॅन्टिक सिनेमा येत्या २८ फेब्रुवारीला रि-रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'रांझणा' हा सिनेमा एका प्रेमकथेवर आधारित आहे. 'रांझणा' ही क्रिशीका लुल्लाची निर्मिती असून ए.आर.रेहमान याने संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता धनुषसह अभय देओल, सोनम कपूर, स्वरा भास्कर, झीशान अय्युब या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.
कथानक
दरम्यान, दिल्ली आणि वाराणसीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालं आहे. लहानपणी पहिल्या नजरेत जोयाच्या प्रेमात पडलेल्या कुंदनची ही कथा आहे. परंतु अखेरपर्यंत तो तिची वाट राहतो, हे त्याच्या मृत्यूचं कारण बनतं.