Join us

हेमा मालिनी नाहीतर 'बागबान'मध्ये दिसली असती ही अभिनेत्री; 'या' कारणामुळे नाकारली ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:14 IST

अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुख्य भूमिका असलेला 'बागबान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

Baghban Movie: अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुख्य भूमिका असलेला 'बागबान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हा मल्टिस्टारर चित्रपट २००३ साली प्रदर्शित करण्यात आला. कौटुंबिक नात्यांवर आधारित असलेला हा सिनेमा आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लोकांना आवडली होती. परंतु 'बागबान'साठी हेमा मालिनी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हत्या. अलिकडेच याचा खुलासा चित्रपटाचे निर्माते रवी चोप्रा यांच्या पत्नीने केला आहे. 

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणु चोप्रा यांनी बरेच खुलासे केले. 'बागबान'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी हेमा मालिनी नाहीतर अभिनेत्री तब्बूला विचारणा करण्यात आली होती. त्यादरम्यान, यश चोप्रा यांच्या पत्नी म्हणाल्या, "बागबानची स्क्रिप्ट वाचल्यानंतर तब्बू भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. आम्हाला वाटलं होतं की ती चित्रपटात काम करायला सहज तयार होईल. परंतु तिने ऑफर नाकारली. "

पुढे त्यांनी सांगितलं, "त्यावेळी तब्बू म्हणाली होती, मला कथा खूप आवडली, पण मला सिनेमात चार मुलांच्या आईची भूमिका अजिबात करायची नाही. माझी संपूर्ण कारकीर्द अजून बाकी आहे. त्यामुळे रवीजी, यावेळी मला माफ करा. असं तिने म्हटलं होतं."

'बागबान' या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी चोप्रा यांनी केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच हेमा मालिनी, अमन वर्मा, समीर सोनी, महिमा चौधरी, सलमान खान आणि रिमी सेन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनहेमा मालिनीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा