Join us

"मला काहीच फरक पडत नाही...", चित्रपटातील बोल्ड भूमिकांबद्दल तृप्ती डिमरीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:17 IST

तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Tripti Dimri:तृप्ती डिमरीचं (Tripti Dimri) नाव सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतलं जातं. संदीप रेडी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या सिनेमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली. याशिवाय तिच्या 'आशिकी 3' (Aashiqui 3) सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे. कार्तिक आर्यन सिनेमात लीड हिरो असणार हे जवळपास निश्चित झालेलं असताना तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) लीड हिरोईन म्हणून विचार सुरु होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तृप्तीला यातून हटवण्यात आल्याची चर्चा होती. यामागे तृप्तीने याधीच्या चित्रपटात साकारलेल्या भूमिका कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातं आहे. आता या सगळ्या चर्चांवर अभिनेत्रीने भाष्य करत मौन सोडलं आहे. 

नुकतीच तृप्ती डिमरीने 'फोर्ब्स इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला 'अ‍ॅनिमल'आणि 'बॅड न्यूज' सारख्या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना तृप्ती डिमरी म्हणाली, "मी माझ्या करिअरमध्ये हेच शिकले की, काही चित्रपट चांगले चालतात तर काही चित्रपटांना यश मिळत नाही. आपण कायमच लोकांना आवडू शकतो, असं काही नाही. काही लोकांना तुम्ही आवडता तर काहींना आवडत नाही. मला यामुळे काहीच फरक पडत नाही. मी नेहमीच मनाचा विचार करते."

त्यानंतर पुढे ती म्हणाली, "उद्या जर तुम्ही मागे वळून पाहिलंत तर एखादी भूमिका साकारल्याचा तुम्हाला पश्चातापही होऊ शकतो. परंतु त्यावेळी तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं होतं."

तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने 'लैला मजनू', 'अ‍ॅनिमल', 'बॅड न्यूज' आणि 'भुल भूलैय्या-३' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्याच्या घडीला ती इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा