Join us

"लोक कायमच पत्नीला दोष देतात...", सैफवरील हल्ल्यानंतर करीनाला ट्रोल करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाने सुनावलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:26 IST

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सातत्याने चर्चेत येत आहे.

Twinkle khanna: मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. अभिनेत्यावर त्याच्या राहत्या घरी एका चोराने घुसून चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सैफ सुखरुप घरी परतला असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु ज्यावेळी सैफ अली खानवर हल्ला झाला त्याक्षणी त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor)घरी नव्हती, असं वृत्त समोर आलं होतं. तर काही जणांचं असंही म्हणणं होतं की करीना घरी होती, पण ती सैफला मदत करु शकली नाही. या प्रकरणी असे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. त्यावर आता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) आपली प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना चांगलंच धारेवर धरलं आहे. 

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांचा ट्विंकल खन्नाने खरपूस समाचार घेतलाय. शिवाय अनेक उदाहारणं देखील तिने दिली आहेत. त्याचबरोबर आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय की, "एका अभिनेत्यावर चाकूने हल्ला झाल्यानंतर अशा हास्यास्पद अफवा पसरवल्या जातात की त्यावेळी त्याची पत्नी घरी नव्हती, शिवाय त्याप्रसंगी ती त्याची मदत करु शकली नाही. असं म्हणत लोकं कायमच स्त्रियांना विशेषतः पत्नीला दोष देतात आणि असं करताना त्यांना बहुतेक चांगलं वाटत असावं. हा पॅटर्न त्यांनी सेट करून ठेवलाय."

यापुढे ट्विंकलने लिहिलंय की, "विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही तर अनुष्का शर्माला दोष दिला जातो. तिला ट्रोल करण्यात येतं. हा खूप मोठा गंभीर विषय आहे. त्याचबरोबर हे सगळं सेलिब्रिटींनाच सहन करावं लागतं असंही नाही. प्रत्येक ठिकाणी हेच सुरु आहे. सगळीकडे कायम महिलेलाच दोष दिला जातो. मला असं वाटतं कोणत्याही पुरुषाच्या यशामागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. ती त्याच्या प्रत्येक सुख- दु:खात सहभागी असते. परंतु कामयच तिला बदनामी सहन करावी लागते."अशा आशयाची पोस्ट लिहित ट्विंकल खन्नाने सैफ अली खानसोबत घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. 

टॅग्स :ट्विंकल खन्नासैफ अली खान करिना कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी