Twinkle Khanaa Post On Kolkata- Badlapur Case : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. ही घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात बालवाडीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलींवर शाळेच्या आवारात अत्याचार करण्यात आला. दरम्यान, आता याप्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक तसेच कलाविश्वातून आवाज उठवण्यात येत आहे. अशातच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावरट्विंकल खन्नाने नुकताच रिलीज झालेल्या स्त्री-२ या चित्रपटाचं उदाहरण देत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय," हॉरर चित्रपट हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भीतीदायक घटनांपेक्षा फार कमी त्रासदायक असतात. अलिकडेच मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि निराशाजनक वास्तव माझ्या समोर आलं. कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या त्यानंतर बदलापुरातील दोन लहानग्या चिमुरडींचे लैंगिक शोषण झालं. शिवाय बिहारमधील एक १४ वर्षीय मुलीने तीन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तिचा बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली". या घटनांचा उल्लेख करत ट्विंकलने संताप व्यक्त केला आहे.
महिला सुरेक्षवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला-
ट्विंकल खन्नाने या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, "भुत अस्तित्वात असलेल्याचा अजुनही कोणता वैज्ञानिक पुरावा मिळाला नाही. पण, माणसाच्या विचारातून निर्माण होणारी ही भीती आहे. माझं असं मत आहे की या भारतातील स्त्रियांना कोणत्याही पुरुषापेक्षा अंधाऱ्या गल्लीत भुताचा सामना करणं जास्त सुरक्षित वाटत असेल".
'स्त्री-२' चित्रपटाचं दिलं उदाहरण-
या घटनेवर भाष्य करत अभिनेत्रीने, 'स्त्री-२' चित्रपटातील कथानकाचाही उल्लेख केला आहे. या सिनेमाचं तिने तोंडभरून कौतुक केलं आहे.