Urmila Matondkar : हिंदी सिनेसृष्टीतील 'रंगीला गर्ल' म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ओळखलं जातं. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेत्रीने मराठी, मल्याळम आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वात उर्मिलाने तिच्या नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा वाऱ्यासारऱ्या पसरत आहेत. उर्मिला मातोंडकर आणि पती मोहसिन अख्तर यांच्यात दुरावा आला असून त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
काश्मिरी व्यावसायिक, मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत थाटला संसार-
उर्मिलाने ३ मार्च २०१६ मध्ये बिझनेसमॅन, मॉडल मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांच्या वयामध्ये साधारण १० वर्षांच अंतर असल्याचं सांगितलं जातं. ८ वर्षाच्या सुखी संसारानंतर या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम द्यायचं ठरवलंय. अभिनेत्री ४ महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या काळात मोहसिनचं अभिनेत्रीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. काही काळानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.असं सांगितलं जातं की, मोहसीनने पहिल्यांदा अभिनेत्रीला लग्नासाठी विचारणा केली होती. त्याच्या या प्रपोझलमुळे उर्मिला थोडी घाबरली होती पण मोहसिन अख्तरने तिचा नकार होकारामध्ये बदलला. आपल्या प्रेमासाठी अभिनेत्रीने जाती-धर्माच्या सीमा ओलांडून लग्न केलं होतं.
कोण आहे मोहसिन अख्तर मीर?
मोहसिन अख्तर एक व्यावसायिक असून मॉडेल देखील आहे. तो मुळचा काश्मिरचा आहे. शिवाय अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमावण्यासाठी तो वयाच्या २१ वर्षी मुंबईत आला. २००७ मध्ये मोहसिन अख्तर मिस्टर इंडिया या स्पर्धेचा सेकंड रनर अप ठरला. शिवाय अभिनेत्री प्रिती झिंटासोबत देखील त्याने एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं आहे. याचबरोबर २००९ मध्ये आलेल्या 'इट्स ए मॅन वर्ल्ड' मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर अभिनयाचे द्वार त्याच्यासाठी खुले झाले. फरहान अख्तर यांच्या 'लक बाय चांस' मध्ये त्याला झळण्याची संधी मिळाली.
परंतु बॉलिवूडमध्ये त्याला पाहिजे तसा स्टारडम मिळाली नाही त्यामुळे मोहसिनने अभिनयाकडे पाठ फिरवली. त्यानंतर त्याने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं.