Join us

घो मला असला हवा! 'या' क्वालिटी असलेल्या मुलाशी उर्वशी करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:01 IST

Urvashi Rautela: अलिकडेच उर्वशीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं आहे. उर्वशीला कसा नवरा हवाय हे तिने सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अनेकदा तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेचा विषय ठरत असते. मात्र, यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच उर्वशीने तिच्या भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी भाष्य केलं आहे. उर्वशीला कसा नवरा हवाय हे तिने सांगितलं आहे.

बऱ्याचदा उर्वशी रेड कॉर्पेटवर पाहायला मिळते.त्यामुळे ती कुठेही दिसली तरीदेखील तिची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी तर तिच्याशी संवाद साधण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि चाहते घोळका करतात. यात अलिकडेच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळीदेखील तिला पाहिल्यावर अनेकांनी तिच्या भोवती गर्दी केली. यात तिला तिच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले.

अलिकडेच उर्वशीने आयफा रॉक्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने अमाटो कॉउचरचा मर्मेड सिल्हूट ड्रेस घातला होता ज्याची किंमत 20 लाख रुपये होती. तर,अवॉर्ड नाईटसाठी उर्वशीने 45 लाख रुपये किमतीचा डिझायनर मायकेल सिन्कोचा ड्रेस घातला. या दोन्ही ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

"उर्वशी सध्या तुझ्या लग्नाच्या अनेक चर्चा सुरु आहेत. त्यामुळे तू लग्न कधी करणार? आणि तुला कसा जोडीदार हवाय?" असे प्रश्न उर्वशीला विचारण्यात आले. त्यावर पहिल्यांदाच तिने यावर मौन सोडत कसा नवरा हवा हे सांगितलं.

"मला कोणत्याही बड्या व्यक्तीसोबत लग्न करायचं नाही. अगदी साधा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलासोबत मला लग्न करायला आवडेल", असं उर्वशी म्हणाली. तिच्या या उत्तरामुळे उर्वशीला सामान्या मुलगा जोडीदार म्हणून हवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, उर्वशी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. मात्र,मेहनत, जिद्द आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर तिने कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. उर्वशी आज ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इतकंच नाही तर अनेकदा तिच्या महागड्या डिझायनर ड्रेस आणि अॅक्सिसेरिजमुळे ती चर्चेत येत असते. 

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडसेलिब्रिटी