'मिलो न तुम तो हम घबराएं... मिलो तो आंख चुराएं, हमें क्या हो गया है' बॉलिवूडचे हे एव्हरग्रीन गाणं आजही लोक तितक्याच आवडीनं ऐकतात, पण तुम्हाला माहित आहे का की या गाण्यातील अभिनेत्रीची मुंबईत हत्या झाली होती. या बॉलिवूड अभिनेत्रीची तिच्या बंगल्यातच हत्या करण्यात आली होती. ही अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंशची, जिची २००० साली जुहू येथे गूढ परिस्थितीत हत्या झाली होती.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्रिया राजवंशी यांच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकण्यात आल्या होत्या. झोपेच्या गोळ्या खाऊन त्या गाढ झोपू लागल्या तेव्हा त्यांचा गळा दाबला गेला. २७ मार्च २००० रोजी सकाळी प्रिया यांच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह पाहून धक्काच बसला. प्रिया यांच्या हत्येच्या बातमीनं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.
प्रिया राजवंश शिमलाच्या रहिवाशी होत्या आणि त्या एका श्रीमंत कुटुंबातील होत्या. त्यांनी शिमल्याच्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतले होते. शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेच्या कार्यक्रमात त्या अनेकदा सहभागी व्हायच्या. त्यांना थिएटर आणि स्टेज शोमध्येही रस होता. प्रिया यांच्या वडिलांना युएनच्या वतीने काही काळासाठी लंडनला पाठवण्यात आले होते. प्रिया ही वडिलांसोबत लंडनला गेल्या होत्या. तिथेही त्यांनी अभिनय केला आणि अनेक कार्यक्रम केले.
चेतन आनंदच्या सिनेमातून मिळाला ब्रेकदरम्यान, तिला बॉलिवूडमधून चित्रपटांच्या ऑफर आल्या. वास्तविक प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांनी प्रिया राजवंश यांचे काही फोटो पाहिले होते आणि त्यांना प्रिया राजवंश यांचे फोटो खूप आवडले होते. त्यावेळी चेतन आनंद हकीकत चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. प्रियाला बॉलिवूडमधून चित्रपटाची ऑफर मिळताच त्या मुंबईत आल्या आणि चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाल्या. प्रिया यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती आणि चेतन आनंदसोबत काम करण्यापेक्षा त्यांच्यासाठी कोणतीही चांगली सुरुवात असू शकत नव्हती.
प्रिया चेतनसोबत होत्या लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्येशूटिंगदरम्यान प्रिया दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या खूप जवळ आल्या. चेतन यांच्या अनेक चित्रपटात त्या नायिका बनली. त्यांचा हीर-रांझा हा चित्रपट खूप गाजला. याशिवाय 'हस्ते जख्म'मधील प्रिया यांच्या कामाचेही खूप कौतुक झाले. चेतन आनंद प्रिया यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. जेव्हा ते प्रियाला भेटले तेव्हा ते आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुले होती. चेतन यांचे त्यांची पत्नी उमा यांच्यासोबत फारसे चांगले संबंध नव्हते आणि त्यामुळे प्रिया आणि चेतन मुंबईत एकत्र राहू लागले होते.
चेतन आनंद यांचे १९९७ मध्ये निधन झालेअनेक वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण असेच चालू होते. प्रिया यांनी फक्त चेतन आनंद यांच्या चित्रपटात काम केले. त्या चेतन यांच्यासोबत पत्नीप्रमाणे राहिल्या आणि त्यांची पूर्ण काळजी घेतली. हळूहळू सगळ्यांनी हे नातं स्वीकारलं, अगदी चेतन आनंद यांच्या मुलांसोबतही प्रिया यांचे संबंध चांगले होते. चेतन आनंद शेवटच्या क्षणापर्यंत प्रिया यांच्या सोबत राहिल्या. १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर प्रिया चेतन यांच्या जुहूच्या बंगल्यात त्यांच्या सावत्र मुलांसोबत राहायला गेल्या. चेतन यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर प्रिया यांची हत्या झाली.
प्रिया यांचा खुनी कोण होता?प्रिया सचदेव यांची हत्या त्यांच्याच मुलांच्या सांगण्यावरून झाली होती. त्यांच्या सावत्र मुलांनी नोकराला त्यांच्या आईला मारण्याची सुपारी दिली होती. चेतन आनंद यांनी आपल्या मालमत्तेचा काही भाग प्रिया यांना दिल्याने केतन आनंद आणि विवेक आनंद नाराज झाले होते. त्यांना हा भाग मिळवायचा होता. प्रिया यांचा त्यांच्यावर आपल्या मुलांसारखा विश्वास असायचा, पण हे भयंकर षडयंत्र त्यांच्या मनात पहिल्यापासूनच चालू होते आणि याच कटाखाली त्यांनी प्रिया यांना आपल्या घरी राहायला बोलावले होते. अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी केतन आनंद, विवेक आनंद आणि त्यांचे दोन नोकर माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.