Join us

यामी गौतमच्या नवऱ्याला पाहिलंत का? वाढदिवशी अभिनेत्रीने लिहिली रोमॅंटिक पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:57 IST

"तू माझ्या आयुष्यातील...", लाडक्या नवरोबाच्या वाढदिवसानिमित्त यामी गौतमची सुंदर पोस्ट

Yami Gautam Post: यामी गौतम ही बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे. 'सनम रे',  'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' तसंच'आर्टिकल -३७०' सारख्या चित्रपटांमधून ती नावारूपाला आली. या चित्रपटांमधील परफॉर्मन्समुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. अलिकडेच यामी 'धूम धाम' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. दरम्यान, यामी गौतमने वैयक्तिक आयुष्यात ४ जून २०२१ रोजी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. 

यामी गौतम सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते. आज पती आदित्य धरच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे. नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना अभिनेत्रीने लिहिलंय, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... तू नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवा अनुभव देण्यास सज्ज आहेस. ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे."

पुढे यामीने म्हटलंय, "तू माझ्या आयुष्यातील असा एक व्यक्ती आहेस जो हुशार आहेच पण मन सुद्धा खूप मोठं आहे. तू एक उत्तम नवरा असण्यासोबतच चांगला बाप देखील आहेस. आदित्य तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा...", अशी रोमॅंटिक पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी आदित्य धर यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्याच्या पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :यामी गौतमबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया