Join us

'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:51 AM

तुम्हाला माहितेय का शोले या सिनेमाचं शुटिंग कुठे झालं होतं. 

अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा शोले चित्रपटात हा खूप हिट झाला होता. आजही अनेक जण सिनेमा मोठ्या आवडीने बघतात. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही खास होती. कारण प्रत्येकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली. पण, तुम्हाला माहितेय का या सिनेमाचं शुटिंग कुठे झालं होतं. 

रमेश सिप्पी यांच्या 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या या आयकॉनिक चित्रपटाची संपूर्ण कथा रामगढ नावाच्या गावाभोवती विणली गेली होती. संपूर्ण चित्रपटात हे गाव उत्तर भारतात असल्याचे दाखवण्यात आलं होतं. पण खरं तरं रामगढ गावाचा सेट हा दक्षिण भारतातील बेंगळुरूजवळील रामनगरा या खडकाळ भागात उभारण्यात आला होता. या भागात चित्रपटाचे शूटिंग करणे सोपे नव्हते. शोलेच्या निर्मात्यांना बेंगळुरू महामार्गापासून रामनगरपर्यंत एक लांब रस्ता तयार करावा लागला होता. 

शोलेचे रामगढ गावही कलादिग्दर्शक राम येडेकर यांनी तयार केले होते. आता हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. पण, संपुर्ण सिनेमा गावामध्ये शूट झालेला नाही. शोलेमधील जेल आणि ट्रेन लुटण्याचा सीन हा मुंबईतील राजकमल स्टुडिओजवळ करण्याता आला होता, जेणेकरून सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करता येईल. तर 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' हे गाणे पुणे आणि पनवेलमध्ये शूट करण्यात आले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनधमेंद्रबॉलिवूडसेलिब्रिटीहेमा मालिनी