ही बॉलिवूड अभिनेत्री आहे विराट कोहलीवर फिदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 9:02 AM
नशीब पालटण्यासाठी केवळ एक क्षण, योग्य संधीही पुरेशी असते, याची अनेक उदाहरणे आपल्याला आजुबाजूला पाहायला मिळतात. आमिर खान स्टारर ...
नशीब पालटण्यासाठी केवळ एक क्षण, योग्य संधीही पुरेशी असते, याची अनेक उदाहरणे आपल्याला आजुबाजूला पाहायला मिळतात. आमिर खान स्टारर ‘दंगल’ या चित्रपटातून गीता फोगटच्या भूमिकेत झळकलेल्या झायरा वसिमची कहाणीही अशीच म्हणावी लागेल. परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या झायराला या एका चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता दिली.तुम्हाला माहितीये का, ‘दंगल’ चित्रपटाच्या आधीपासूनच झायरा या चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली होती. कारण, याआधीच तिने ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. पण, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी बराच वेळ गेला. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’मधून झायराने पुन्हा एकदा आपली अभिनयक्षमता सिद्ध केली. त्यामुळे सध्याच्या घडीला झायरासुद्धा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास येत आहे. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या झायराला खेळाचीही तितकीच आवड आहे. ‘११ व्या बंगळुरू मिडनाईट मॅरथॉन’ची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झायराने तिच्या आवडत्या खेळाडूचे नावही सांगितले आहे.‘रोटरी क्लबमध्ये सहभागी झाल्यापासूनच मला मेरी कॉम फार आवडू लागली आहे. रुपेरी पडद्यावर जर मेरी कॉमच्या आयुष्यावर पुन्हा एकदा चित्रपट साकारला गेला तर मला तिची भूमिका साकारायला आवडेल’, असेही ती म्हणाली. मेरी कॉम सोबतच आणखी एका खेळाडूचा झायरावर प्रभाव आहे. मुख्य म्हणजे त्या खेळाडूने आणखीही काही बी- टाऊन अभिनेत्रींवर प्रभाव पडला आहे. झायरावर प्रभाव पाडणारा तो खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. ‘विराट कोहली हा एक असा खेळाडू आहे, ज्याचा माझ्यावर फार प्रभाव आहे. इतरांप्रमाणेच मलाही त्याचा फार आदर वाटतो’, असे झायरा म्हणाली.‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने ‘हिजाब’बद्दल मांडले वेगळे विचार!तसेच झायराने दिलेल्या एखा मुलाखतीत, मी कधीच ग्लॅमरस भूमिका करू शकत नाही. मी एका वेगळ्या वातावरणात मोठी झालीयं. माझ्यासाठी अभिनयाचा अर्थ फेम आणि ग्लॅमर असा होत नाही. अभिनय हा माझ्या जीवाभावाचा विषय असून त्यावर मी कधीच डाग लागू देणार नाही, असेही तिने या मुलाखतीवेळी सांगितले.मध्यंतरी क्रिडामंत्री विजय गोयल यांनी जायरावी तुलना एका पेन्टिंगसोबत केली होती. या पेन्टिंगमध्ये एक महिला बुर्का घालून होती. जायराला ही तुलना अजिबात रूचली नव्हती. मला अशा पेन्टिंगशी जोडले जायला नको, अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली होती.