संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली निर्भया प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फासावर लटकवले. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी दिल्यानंतर अनेक स्तरातून याचं कौतुक आहे. यावर बॉलिवूड सेलिब्रेटींनी ट्विट करुन आपलं मतं व्यक्त केले आहे.
अखेर निर्भया प्रकरणाचा शेवट झाला. ही न्याय प्रक्रिया अजून वेगवान व्हायला हवी होती पण मला आनंद आहे की अखेर न्याय मिळाला. निर्भया आणि तिच्या आई-वडिलांना शांती मिळो. पुढे प्रिती म्हणते, 2012 साली जर न्याय मिळाला असता तर महिलांवरील किती तरी गुन्हे थांबले असते.
ऋषी कपूर हे या प्रकरणावर ट्विट करताना लिहितात, 'जैसी करनी वैसी भरनी'. बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला महिलांचा सन्मान करावाच लागेल. त्या लोकांना लाज वाटली पाहिजे ज्यांच्यामुळे आरोपींना शिक्षा देण्यास उशीरा झाला. जय हिंद ' अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.