बॉलिवूडमध्ये अनेकांनी केवळ आणि केवळ अभिनयाच्या जोरावर यशाची चव चाखली. पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर सगळे काही अनुभवले. पण यापैकी काहींसोबत नियतीचे असा काही खेळ खेळला की, एकेकाळी ऐश्वर्यात नांदणारे हे स्टार्स पुढे एका एका पैशासाठी मोताद झालेत. आज अशाच काही स्टार्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ओ. पी. नय्यर
ओपी नय्यर म्हणजे सुरांचे बादशहा. शास्त्रीय संगीताचे कुठलेही शिक्षण न घेता ओ.पी. नय्यर यांच्या गाण्यांनी बॉलिवूडप्रेमींना वेड लावले. ओ. वी. नय्यर एकेकाळी अतिशान आयुष्य जगले. त्याकाळी एका सिनेमाचे लाख रूपये घेणारा संगीतकार अशी त्यांनी ओळख होती. पण दारूचे व्यसन हेच त्यांचे पतनाचे कारण ठरले. मृत्युपूर्वी त्यांना कधी नव्हे असे दिवस भोगावे लागले. अगदी त्यांचा जीव की प्राण असलेला बाजा त्यांना विकावा लागला.
अचला सचदेव
अचला सचदेव यांनी अनेक चित्रपटांत काम केले. पण सरतेशेवटी पतीच्या मृत्यूनंतर 12 वर्षे एकटीने दोन बीएचके फ्लॅटमध्ये त्यांना आयुष्य कंठावे लागले. रात्री एक अटेंडेंट त्यांच्यासोबत राहायची. एकदिवस अचला पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेल्या आणि पडल्या. त्यांच्या पायाचे हाड तुटले. पुढे त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला. या काळात बॉलिवूडची एकही व्यक्ति त्यांना भेटायला गेली नाही. तीन महिने हॉस्पीटलमध्ये राहिल्यानंतर उपचारासाठीही पैसे उरले नाहीत. अखेर 2012 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.
परवीन बाबी
एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री परवीन बाबीने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. पण तिचा अंत दु:खद ठरला. 20 जानेवारी 2005 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 22 जानेवारीपर्यंत त्यांचा मृतदेह घरात पडून होता. परवीनने आत्महत्या केली होती की तिचा मृत्यू झाला होता, हे आजपर्यंत कुणाला ठाऊक नाही.
मीना कुमारी त्याकाळातील ट्रॅजिडी क्वीन. मीना कुमारींचा मृत्यूही ‘ट्रॅजिडी’ ठरला. कमाल अमरोही यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतरही मीना कुमारींनी पाकिजा चित्रपट केला. हा चित्रपट 4 फेब्रुवारी, 1972 रोजी रिलीज झाला. याचदरम्यान मीना कुमारींची तब्येत बिघडली. आजारी असतानाही चित्रपट केले. परंतु, हा आजार बळावला. प्रेमात अयशस्वी झालेल्या मीना यांनी मद्य पिण्यास सुरूवात केली, ज्यामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस झाला. 31 मार्च 1972 रोजी त्यांचे निधन झाले.
मिताली शर्मा
मिताली शर्मा हे भोजपुरी इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. मितालीने पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सगळे काही कमावले. पण एक वेळ अशीही आली की, मिताली मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळली. एवढेच नाही तर चोरीचा प्रयत्न करतानाही ती सापडली. चित्रपट मिळणे बंद झाल्यावर मिताली डिप्रेशनमध्ये गेली होती.
एकेकाळी प्रसिद्धीच्या व श्रीमंतीच्या शिखरावर असलेल्या दादांच्या बाबतीत नियतीची चक्रे अशी काही उलटी फिरली की अगदी होत्याचे नव्हते झाले. परिस्थिती व शरीर दोन्ही नीटपणे साथ देईनाशी झाली. अन्य अनेक कारणांमुळे दादा खचले. झमेला व लबेला सारखे सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी सगळे काही गमावले. एकेकाळी अलिशान गाड्यांमध्ये फिरणारे भगवान दादांचा शेवट दुर्दैवी राहिला.
भारत भूषण
गंभीर भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते भारत भूषण आठवले की बैजू बावरा, मिर्जा गालिब, तानसेन हे चित्रपट हटकून आठवतात. पण काही वर्षांनंतर त्यांना काम मिळणे बंद झाले. पुढे पोट भरण्यासाठी एक फिल्म स्टुडिओबाहेर गेटकिपरची नोकरी करण्याची वेळही नियतीने त्यांच्यावर आणली. एकेदिवशी भाड्याच्या फ्लॅटमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गीतांजली नागपाल
गीतांजली नागपाल त्याकाळची सुपरमॉडेल होती. पण ड्रग्जचे व्यसन लागले आणि गीतांजली सगळे गमावून बसली. दक्षिण दिल्लीच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ तिच्यावर आली. मोलकरणीचे कामही तिने केले.
जगदीश माळी
जगदीश माळी एक अद्भूत फोटोग्राफर होते. अभिनेत्री अंतरा माळीचे ते वडील. अंधेरीच्या रस्त्यावर भीक मागताना ते दिसले होते. या काळात सलमान खानने त्यांची मदत केली. पैशांसाठी जगदीश यांना त्यांचा फोटो स्टुडिओही विकावा लागला होता.