डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात हे बॉलिवूड सेलेब्स लावणार तडका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 8:21 PM
हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये वादग्रस्त ठरत असलेले अमेरिकेचे ४५ वे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी जोरदार तडका लावणार ...
हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये वादग्रस्त ठरत असलेले अमेरिकेचे ४५ वे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी जोरदार तडका लावणार आहेत. या सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलेब्सबरोबरच ३० डान्सरांनाही ट्रेन करण्याचे काम केले जात आहे. मनस्वी ममगई येत्या शुक्रवारी हा शपथविधी सोहळा पार पाडला जाणार असून, यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा कलाक्षेत्राशी जवळचा संबंध असल्याने त्यांचा शपथग्रहण सोहळाही त्याच थाटामाटात करण्याची तयारी केली जात आहे. कोरिओग्राफर सुरेश मुकुंद यांचा डान्स ग्रुप यावेळी परफॉर्म करणार असून, ‘अॅक्शन जॅक्शन’ फेम मनस्वी ममगई हे या ग्रुपला लीड करणार आहे. या डान्स ग्रुपमध्ये तब्बल ३० भारतीय डान्सरचा समावेश असून, बॉलिवूडमधीलच काही गाण्यांवर ते जबरदस्त परफॉर्म करून या सोहळ्यात रंगत आणणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्टस ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ देणार आहेत. यूएस कॅपिटलच्या वेस्ट लॉनमध्ये होणाºया सोहळ्याची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही थीम असेल. या सोहळ्याच्या सात मिनिटांसाठी भारतीय कलाकारांसोबतच अमेरिकेचेही काही कलाकार परफॉर्म करणार आहेत. सध्या मुंबईच्या नालासोपाला येथील सुरेश मुकुंद ३० भारतीय डान्सर्सला ट्रेन करण्याचे काम करीत आहेत. सुरेश मुकुंद यांचा ‘किंग्स युनाइटेड इंडिया’ हा असा पहिला असा इंडियन गु्रप ठरला आहे, ज्याने २०१५ मध्ये झालेल्या सर्वांत मोठ्या हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये ब्राँज मेडल पटकावले आहे. याविषयी मुकुंद यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. ही माझ्यासाठी लाइफटाइम संधी आहे. सध्या मी माझा असिस्टंट कार्तिक प्रियदर्शन याच्यासोबत इंडियन परफॉर्मसच्या स्टेप्स अमेरिकन परफॉर्मरच्या स्टेपशी मॅच करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. सुरेश मुकुंदया सोहळ्यात इंडो-अमेरिकन ड्रमर रवि जखोटिया नॅशनल मॉलमध्ये हजारो लोकांच्या समोर परफॉर्म करणार आहे. रवि अमेरिकन टीव्ही सीरिजचे पहिले इंडो अमेरिकन म्युझिक डायरेक्टर राहिले आहेत. यावेळी अमेरिकेतील काही मोठे आर्टिस्टही त्याच्यासोबत परफॉर्म करणार आहेत. त्याचबरोबर पुणे येथे सिम्बॉयसिस नॅशनल युनिर्व्हसिटीतून बीए केलेले ओशिका नियोगी हादेखील ही सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ती गेल्या मंगळवारीच मुंबई येथून न्यू यॉर्कला रवाना झाले आहेत. ठाणे येथील रहिवासी असलेली ओशिका नियोगी पाच दिवसांच्या यूएस प्रेसिडेंशियल इनॉगरेशन लीडरशिप समिटमध्येही सहभागी होणार आहे. ती त्याठिकाणी युथ भारताचे प्रतिनिधित्व करताना बघावयास मिळणार आहे. १२६३ कोटी रुपये खर्चद न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे १२६३ कोटी रुपये खर्च येणार आहे. लोकांची गर्दी बघता सुरक्षेच्या कारणास्तव याखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी आतापर्यंतचा सर्वांत महाग तिकीट दर असणार आहे. सर्वांत महागडे तिकीट ६.३६ कोटी रुपयांचे असेल. जो व्यक्ती हे तिकीट खरेदी करणार त्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्याबरोबर डिनर करण्याची संधी मिळणार आहे. हे तिकीट खरेदी करण्यासाठी बरीचशी मंडळी रांगेत उभी असल्याचे समजते.