Join us

चीनमध्येही ‘चांदनी’चा बोलबाला, श्रीदेवीच्या ‘मॉम’चं हे आहे चीन कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 1:17 PM

'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनी अभिनेत्री श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होतं. याशिवाय काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ स्टारर 'झिरो' चित्रपटात श्रीदेवी यांची छोटीशी भूमिका होती.

ठळक मुद्दे'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनी केले होते कमबॅक.'मॉम' हा श्रीदेवी यांचा अखेरचा चित्रपट होता.'झिरो' चित्रपटात श्रीदेवी यांची होती छोटीशी भूमिका.

हिंदी चित्रपटसृष्टीची चांदनी म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांना पहिल्या पुण्यतिथीनिमित्त साऱ्या देशानं आदरांजली वाहिली. रसिकांच्या मनात श्रीदेवी कायम घर करून आहेतच. मात्र पहिल्या पुण्यतिथीला रसिक लाडक्या अभिनेत्रीच्या आठवणीत रमून गेले. श्रीदेवी यांच्या रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. श्रीदेवी यांचा 'मॉम' हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. मॉम हा श्रीदेवी यांचा अखेरचा चित्रपट होता. यातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. आता हाच चित्रपट येत्या २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी भारतासह 'मॉम' हा चित्रपट पोलंड, यूएई, सिंगापूर आणि अमेरिकेसह ४० ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. 

रवी उद्यावर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होतं. 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनी अभिनेत्री श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होतं. याशिवाय काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ स्टारर 'झिरो' चित्रपटात श्रीदेवी यांची छोटीशी भूमिका होती. 

श्रीदेवी यांच्या निधनाला वर्षं झाले असले तरी या दुःखातून आजही त्यांचे कुटुंब सावरलेले नाही. श्रीदेवी यांच्या आठवणींना जतन करून ठेवण्यासाठी बोनी कपूर लवकरच श्रीदेवी यांच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री बनवणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूर यांनी श्री, श्रीदेवी आणि श्रीदेवी मॅम हे तीन टायटल रजिस्टर सुद्धा केले आहेत. श्रीदेवी यांनी काम केलेल्या सिनेमांचे टायटलही बोनी कपूर यांनी रजिस्टर केले आहे. त्यांनी एकूण 20 टायटल्स रजिस्टर केली असून या डॉक्यूमेंट्रीमध्ये सगळेच रिअल फुटेज वापरले जाणार आहेत. त्यामुळे श्रीदेवी यांचं जगणं एका वेगळ्याप्रकारे त्यांच्या चाहत्यांसमोर येणार आहे.

श्रीदेवी सार्वजनिक कार्यक्रमांना पाश्चिमात्य कपड्यांपेक्षा साडीमध्ये हजेरी लावणे अधिक पसंत करत असत. त्यांना त्यांच्या अनेक साड्या प्रचंड आवडत असत. त्यातही त्यांची एक जांभळ्या रंगाची कोटा साडी ही त्यांची अतिशय आवडती होती. ही साडी त्यांनी अनेक वर्षं जपून ठेवली होती. त्यांच्या या साडीचा लिलाव करण्याचे त्यांचे पती बोनी कपूर यांनी ठरवले असून या लिलावातून मिळणारा पैसा चांगल्या कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. या साडीच्या लिलावातून येणारा पैसा कर्न्सन इंडिया फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येणार आहे. हा लिलाव परिसेरा या वेबसाईटवर होणार असून त्यावर लाईव्ह अपडेट लोकांना कळणार आहेत. लिलावाची रक्कम ४० हजारापासून सुरू होणार आहे.  

टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूर