Join us

स्वप्नील शिंदे नाही, सायशा शिंदे...! दीपिका-करिनाच्या स्टायलिस्टने केला ट्रान्सवुमन असल्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 4:11 PM

स्वप्नील आता सायशा शिंदे या नव्या नावाने ओळखला जाईल.

ठळक मुद्देसायशाच्या या निर्णयाचे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वागत केले आहे. सनी लिओनी, अदिती राय हैदरी शिवाय मराठमोळी सई ताम्हणकर आदींनी त्याच्या या निर्णयाला पाठींबा दशर्वला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि करिना कपूर व दीपिका पादुकोणचा स्टायलिस्ट स्वप्नील शिंदेने नुकतीच एक मोठी घोषणा केली. होय, आपण ट्रान्सवुमन असल्याचा खुलासा त्याने मंगळवारी केला. स्वप्नील आता सायशा शिंदे या नव्या नावाने ओळखला जाईल.  ट्रान्सवुमन झाल्याचा खुलासा करत स्वप्नीलने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये तो तरूणीच्या रूपात आहे. हीच ती सायशा शिंदे. सायशाने या पोस्टसोबत एक भावूक पोस्टही लिहिली आहे. 

यात सायशा म्हणते, ‘कॉलेजच्या दिवसात मुलं माझी खिल्ली उडवायचे. कारण मी त्यांच्यातली एक नव्हते. तो काळ खूप वाईट आणि मनावर घाव घालणारा होता. जे माझे अस्तित्व नाहीच, ते जगताना मला गुदमरल्यासारखे व्हायचे. पण मी आता ख-या अर्थाने मुक्त झाले आहे. सायशाचा अर्थ होतो एक सार्थक आयुष्य. मलाही माझे आयुष्य सार्थकी लावायचे आहे. अनेक वर्ष मी स्वत:ला गे समजत होते. कारण मला पुरूषांप्रति आकर्षण होते. मात्र आजपासून 6 वर्षांपूर्वी मी गे नसून ट्रान्सवुमन असल्याचे मला कळले. त्याक्षणी ते सत्य मी स्वीकारले. आता मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी गे मॅन नाही तर एक ट्रान्सवुमन आहे.’

सायशाच्या या निर्णयाचे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वागत केले आहे. सनी लिओनी, अदिती राय हैदरी शिवाय मराठमोळी सई ताम्हणकर आदींनी त्याच्या या निर्णयाला पाठींबा दशर्वला आहे. स्वप्नील अर्थात सायशाने सनी लिओनी, दीपिका पादुकोण, करिना कपूर, कियारा अडवाणी, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा अशा अनेकींसाठी डिझायनर म्हणून काम केले आहे.

 

टॅग्स :बॉलिवूड