Join us

'गदर'मध्ये आयकॉनिक 'हॅंडपंप सीन' करण्यास सनी देओलने दिलेला नकार; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 10:50 AM

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर'मधील आयकॉनिक हॅंडपंप सीनवर भाष्य केलं आहे.

Sunny Deol: २००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. जवळपास २३ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या (Sunny Deol) चित्रपटाने इतिहास रचला. आजही या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली होती. तसेच या चित्रपटातील सगळेच संवाद आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. गदर या चित्रपटाचं नाव कानावर पडताच त्यामध्ये सनी देओलने केलेला हॅंडपंप सीन आपसूकच डोळ्यांसमोर उभा राहतो. परंतु हा आयकॉनिक सीन करण्यास सनी देओलचा नकार होता. यावर अनिल शर्मा यांनी भाष्य केलं आहे. 

अभिनेता सनी देओल तसेच अमिषा पटेल गदर चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. नुकतीच 'गदर' सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखती चित्रपटाविषयी खुलासे केले. त्यावेळी त्यांनी सनी देओलच्या आयकॉनिक हॅंडपंप सीनवरही भाष्य केलं. या मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले," जेव्हा मी हॅंडपंपच्या  सीनबद्दल विचार करत होतो, तेव्हा चित्रपटाचे लेखक, निर्माता तसेच सनी देओलही याबाबत शास्वती नव्हती. त्यांना हा सीन योग्य वाटत नव्हता. यावर बराच वेळ चर्चा झाली, त्यासाठी काही वेळ शूटिंगही थांबवावं लागलं होतं. मला माहित होतं की हे सगळं शक्य आहे". 

पुढे ते म्हणाले, "हा सीन करण्यामागचा फक्त एकच विचार होता की कोणीही माझ्या देशाबद्दल वाईट उद्गार काढले तर ते मी सहन करू शकत नाही. त्या रागात मी काहीही करू शकतो. त्यासाठी चित्रपटात हॅंडपंप उखाडण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्यानंतर केवळ या सीनमुळे चित्रपट गाजला". 

अलिकडे 'गदर-२' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'गदर-२'  २०२३ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. शिवाय या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींहून अधिक कमाई केली.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा