Karan Johar: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) कोणत्याही परिचयाची गरज नाही. करण जोहर त्याच्या सुपरहिट सिनेमांव्यतिरिक्त फॅशन सेन्सने प्रेक्षकांचे कायमच लक्ष वेधून घेतो. याशिवाय तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो. नुकतीच करणने त्याच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे. शिवाय आपल्या मुलांची नावे रुही आणि यश ठेवण्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे. करण जोहर अविवाहित असून सरोगसीद्वारे तो दोन मुलांचा बाबा आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करण व त्याची आई हिरू जोहर दोघेही या मुलांचा सांभाळ करतात.
नुकतीच करण जोहरने त्याच्या लाडक्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबतचे काही अनसीन फोटो इन्स्टाग्रामवर सुद्धा पोस्ट केले आहेत. त्याशिवाय या पोस्टला खास कॅप्शन देत त्याने म्हटलंय,"वडील होणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. मी मुलांची नावं माझ्या पालकांच्या नावावरून ठेवली आहेत. याचं कारण म्हणजे वारसा हक्क पुढे चालवण्याबरोबरच आपल्या भावना सुद्धा कायम राहणं महत्त्वाचं आहे. ते दोघेही माझं जग आहेत". अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. करण जोहने शेअर केलेल्या या पोस्टवर अभिनेता आयुषमान खुराना तसेत जान्हवी कपूर यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवर करण जोहरने आपल्या मुलांसोबत मजामस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा आणि मुलांमधील बॉण्ड पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. दरम्यान,२०१७ मध्ये तो सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुही या जुळ्या मुलांचा बाबा झाला. त्यानंतर करणला नेहमीच ट्रोल्स आणि टीकेला सामोरं जावं लागलं.