Join us

"जय बजरंगबली..." 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 5:22 PM

रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Singham Again Frist Song : रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. एकीकडे चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच त्याला अवघ्या २४ तासांत १३८ मिलियनहून अधिक व्हूज मिळाले होते. त्यात सिनेमातील नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. हे गाणं सिनेरसिकांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय. 

'सिंघम अगेन' मधील गाण्यामध्ये अजय देवगन आणि रणवीर सिंग सीतेच्या शोधात म्हणजेच करीना कपूरला  शोधण्यासाठी बाहेर पडतात. सारेगमप म्यूझिकच्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित केलं गेलं आहे.  'जय बजरंगबली' गाण्यासाठी श्रीकृष्ण, करीमुल्लाह, अरुण कौंडिन्य, चैतू सत्संगी, श्री साई चरण, सुधांशु, रितेश जी राव, सात्विक जी राव, पृथ्वी चंद्रा, लक्ष्मी नायडू, अद्वितेय, श्रुति रंजनी, प्रणति, ऐश्वर्या दारुरी, साहिथीसह यांसारख्या गायकांनी आपला आवाज दिला आहे. 

अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'सिंघम' (Singham Movie) या फ्रेंचाइजी चित्रपटाचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 'सिंघम अगेन' (Singham Again) चर्चेत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

'सिंघम अगेन'मध्ये दिसणार हे कलाकार

सिंघम अगेनबद्दल बोलायचे तर दीपिका या चित्रपटात शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी 'कॉप युनिव्हर्स'ची पहिली महिला आहे. या ॲक्शनने भरलेल्या चित्रपटात रणवीर पुन्हा सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीरणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा