गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन रामपाल याच्याकडे एनसीबी तपास करत होती. नुकतीच त्याच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, अर्जुन रामपाल हा आफ्रिकेला पळून जाणार होता असे एनसीबाकडून सांगण्यात आले आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातून एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना औषधाच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. आता एनसीबीने एक चार्जशीट फाईल केली आहे. त्यात अर्जुनला ड्रग्ज प्रकरणात संशयित असे मानले गेले आहे. हा खुलासा एका चार्जशीटमधून करण्यात आला आहे. दुसरे म्हणजे त्या चार्जशीटनुसार एनसीबीने रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रीकेच्या काऊंसलेट जनरला फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिली आहे.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (NCB)ने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात ११,७०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण ३३ आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.