Bollywood Drugs Connection: 'ड्रग म्हणून निवड केली दारूची', पूजा भटचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 04:43 PM2020-09-24T16:43:40+5:302020-09-24T16:45:25+5:30
ड्रग्सच्या चर्चांमध्ये पूजा भटने सांगितली आपबीती, म्हणाली - माझ्यासाठी दारू हे आहे ड्रग्स
एकिकडे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती पूजा भटनेदेखील मोठा खुलासा केला आहे. पूजा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासाठी दारू हेच ड्रग्स असल्याचे म्हटले आहे. तिने या पोस्टमध्ये तिची आपबीती सांगितली आहे.
पूजा भटने प्रायव्हेट इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या खासगी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ सर्वांसमोर सांगितला आहे. जेव्हा मद्याच्या नशेत धुंद असणाऱ्या पूजाने यातून बाहेर पडण्यासाठी परिस्थितीला मोठ्या धीराने आणि संयमाने सामना केला होता. आपल्या जीवनातील आव्हानात्मक काळाबाबत सांगताना हा मुद्दा असा जाहीरपणे मांडण्यामागचे उद्देशही तिने स्पष्ट केले आहे.
पूजाने सांगितले की, 'तीन वर्षे आणि नऊ महिने संयम ठेवण्यात गेला. काही महिन्यात चार वर्षे होईल. एक अशी व्यक्ती जिने खुलून ड्रिंक केले आहे. मी माझ्या रिकव्हरीबद्दल बोलायचे ठरविले आहे. कित्येक वेळेला लोकांनी माझ्याबद्दल वाईट बोलले आहेत. पण त्याहून जास्त लोकांनी मला धाडसी म्हटलं आहे.
नशेच्या व्यसनाबद्दल पूजा म्हणाली..
लोक नशेबद्दल बोलणाऱ्या लोकांना धाडसी संबोधतात, हे ऐकून पूजा भट हैराण झाली. ती म्हणाली की, नशेच्या व्यसनाला लोकांकडून उत्तेजना मिळते आणि हिच लोक नशा करणाऱ्या लोकांना गुन्हेगार म्हणतात.त्या व्यक्तीसोबत काय झाले आहे हे जाणून घेतल्याशिवाय. आज मी आधीपेक्षा खूप जास्त या गोष्टी समजू शकते की लोक नशेच्या व्यसनाचा कलंक लावते आणि त्याला अपराधी घोषित करते. हे जाणून न घेता की कुणाला नशेचे व्यसन का लागले.
मद्य प्राशन करणे हा सर्वस्वी आपला निर्णय होता, असे सांगत तिने लिहिले 'दारू हेसुद्धा एक प्रकारचे ड्रग्ज झाले आणि ते मी निवडलेले ड्रग होते. दारु बहुतांश समाजात सर्वसामान्य आहे याचा अर्थ असा नाही की ते ड्रग नाही. मला मागील काही वर्षांत दारू पिण्यापेक्षा दारु न पिण्यासाठी किंवा मद्यप्राशन न करण्यासाठी अनेक कारणे द्यावी लागली'. हा वैचारिकदृष्ट्या मोडकळीस आलेला समाज तेव्हाच सावरेल जेव्हा सातत्याने कोणाबाबत पूर्वग्रह बांधणे बंद होईल असेदेखील तिने पोस्टमध्ये म्हटले.
रकुल प्रीत सिंह म्हणते समन्स मिळालाच नाही तर NCB म्हणाली ती कारण देत आहे!