Join us

चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात चोरी, व्यवसायाला 22,400 कोटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 9:15 PM

गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीत मोठी चोरी होत आहे.

Bollywood Film Piracy : भारतात दरवर्षी विविध भाषांमधील 1000 हून अधिक चित्रपट तयार होतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीला पायरसी नावाच्या वाळवीने पोखरुन काढले आहे. या पायरसीमुळे चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कन्सल्टन्सी फर्म EY आणि इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने त्यांच्या 'द रॉब रिपोर्ट'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाला पायरसीमुळे 22,400 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

51% ग्राहक पायरेटेड कंटेट पाहतात'द रॉब रिपोर्ट'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात मनोरंजन कंटेट पाहणारे 51 टक्के ग्राहक बेकायदेशीर स्त्रोतांकडून चित्रपट, वेब सिरीज इत्यादी कंटेट मिळवतात. एकूण पायरेटेड कंटेटपैकी जास्तीत जास्त 63 टक्के कंटेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे व्हायरल केले जातात. या अहवालात पायरसीचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी नियमन लागू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अहवालानुसार, देशातील मनोरंजन उद्योग हा महसूलाच्या बाबतीत चौथा सर्वात मोठा उद्योग ठरला आहे.

चित्रपटगृहातून सर्वाधिक पायरसीअहवालानुसार, पायरसीमध्ये झालेल्या एकूण नुकसानापैकी 13,700 कोटी रुपयांचे नुकसान देशातील चित्रपटगृहांमध्ये बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केलेल्या कंटेटमुळे झाले आहे. तर OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेटच्या पायरसीमुळे 8,700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे केंद्रातील सरकारलाही 4,300 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनात फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बॉलिवूडगुन्हेगारी