Join us

राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारे प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:07 IST

सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्माते सलीम मर्चंट यांचं निधन झालं आहे. सलीम यांनी राणी मुखर्जीपासून तमन्ना भाटियापर्यंत अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलं

नुकतंच मनोज कुमार (manoj kumar) यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाला चांगलाच धक्का बसला. अशातच बॉलिवूड जगतातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते सलीम अख्तर (salim akhtar) यांचं निधन झालं आहे. काल ८ एप्रिलला सलीम यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम यांचं निधन कशामुळे झालं, याविषयी कोणतंही कारण अद्याप कळू शकलं नाही. राणी मुखर्जीला (rani mukherjee) इंडस्ट्रीत लाँच करण्यात सलीम अख्तर यांचं मोलाचं योगदान होतं. सलीम यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.

राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत केलं होतं लाँच

सलीम अख्तर यांनी निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. 'फूल और अंगारे', 'कयामत' यांसारख्या सुपरहिट सिनेमांच्या निर्मितीमागे सलीम अख्तर यांचं मोठं योगदान होतं. याशिवाय १९९७ साली रिलीज झालेल्या 'राजा की आएगी बारात' सिनेमाची निर्मिती करुन राणी मुखर्जीला त्यांनी इंडस्ट्रीत लाँच केलं. याशिवाय २००५ साली 'चाँद सा रोशन चेहरा' सिनेमातून त्यांनी तमन्ना भाटियाला लाँच केलं होतं. नवीन टॅलेंटला इंडस्ट्रीत प्रोत्साहन देण्यात सलीम अख्तर यांचं मोलांचं योगदान होतं.

सलीम यांनी ८ एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सलीन यांनी प्राणज्योत मालवली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सलीम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचा सुवर्णकाळ ज्यांनी बघितला आणि अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती ज्यांनी केली अशा सलीम यांच्या निधनाने कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. 

टॅग्स :राणी मुखर्जीतमन्ना भाटियाबॉलिवूड