Frist glamor girl of bollywood : हिंदी सिनेजगतात असे काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवून त्यांनी सिनेसृष्टीवर आपला ठसा कायमचा उमटवला. आपण या निमित्ताने १९५० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या 'ग्लॅमर गर्ल' विषयी जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानात जन्मलेल्या या अभिनेत्रीचं हिंदी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान राहिलं आहे. बेगम पारा असं या अभिनेत्रीचं नाव आहे. १९४०- ५० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री म्हणून बेगम पारा ओळखल्या जायच्या. अवघ्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बेगम पारा यांचं अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबतही खास नातं होतं. दिलीप कुमार यांचा भाऊ नासिर खानसोबत त्यांनी लग्न केलं होतं.
ग्लॅमर गर्ल नाव कसं मिळालं -
२००७ मध्ये आलेला दिग्दर्शक संजय लिला भंसाली यांचा 'सांवरिया' हा चित्रपट त्यांच्या सिने कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात बेगम पारा यांनी सोनम कपूरच्या आजीची भूमिका वठवली होती. मनोरंजन विश्वातील मोठ्या प्रवासानंतर २००८ मध्ये बेगम पारा यांनी जगाचा निरोप घेतला.
अभिनेत्री बेगम पारा या ५० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होत्या. त्याकाळी त्यांनी एका मॅगझिनसाठी केलेलं फोटोशूट चर्चेत आलं होतं. या फोटोशूटमुळे बेगम पारा प्रकाशझोतात आल्या. त्यामुळे अभिनेत्रीला 'बॉम्ब शेल' तसेच'पिन अप गर्ल' नावाने त्यांना लोक ओळखु लागले. पांढऱ्या रंगाची साडी, तोंडात सिगारेट अशा पद्धतीत हटके पोज देत त्यांनी फोटो काढले होते.
असा होता सिने प्रवास...
१९४४ मध्ये आलेला 'चांद' हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. या सिनेमात त्यांनी अभिनेता प्रेम आदिबसोबत काम केलं. 'सोहनी महिवाल' (१९४६), 'जंजीर' (१९४७), 'मेहंदी' (१९४७) या सिनेमात बेगम पारा नर्गिससोबत झळकल्या. 'नील कमल' (१९४७) मध्ये त्यांनी राजकपूर आणि मधुबाला याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. त्याचबरोबर 'लैला मजनूं' (१९५३), 'नया घर' (१९५३) आणि 'पहली झलक'(१९५५) या सिनेमात देखील त्यांनी काम केलं.