मुंबई - ट्विटरने ‘द्वेषयुक्त आचरण आणि अपमानकारक वर्तन’ धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले. ट्विटरने मंगळवारी एका निवेदनाच्या माध्यमाने ही माहिती दिली. 34 वर्षीय कंगनाचे अकाउंट ‘अॅट कंगना टीम’वर आता ‘अकाउंट सस्पेंडेड’ (अकाउंट निलंबित) असा मेसेज दिसत आहे. कंगना रणैत सोशल मिडियात भडकावू ट्विट्स करण्यासाठी ओळखली जाते. (Bollywood Kangana Ranaut account permanently suspended for repeated violations of twitter rules)
कंगनाने पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत अभिनेत्री कंगनाने हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले होते. तसेच त्यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दांचाही उल्लेख केला होता.
ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे, आम्ही स्पष्ट केले आहे, की ज्या व्यवहारामुंळे ऑफलाइन नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. अशा व्यवहारांवर आम्ही कठोर कारवाई करू.
ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर कंगना रणौतने दिली पहिली प्रतिक्रिया
ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, की "ट्विटरच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल, विशेषतः आमच्या द्वेषयुक्त वर्तन धोरण आणि अपमानास्पद धोरणाबद्दल संबंधित खाते कायमचे बंद केले आहे. आम्ही न्यायपूर्ण पद्धतीने आणि निष्पक्षपणे ट्विटर नियम सर्वांसाठी लागू करतो.”
ट्विटरच्या अपमान विषयक धोरनानुसार, ‘‘कुणीही कुणाचा निशाना बनवून अपमान करू नये अथवा अपमान करण्यासाठी, धमकावण्यासाठी अथवा याचा प्रयत्न करण्यासाठी इतरांना भडकावू नये, तसेच इतरांचा आवाजही दाबू नये,” असे ट्विटरने म्हटले आहे.
ट्विटरने धोरणाचा हवाला देताना म्हटले आहे, की जेव्हा एखादे अकाउंट बंद केले जाते, तेव्हा अकाउंड युझरला, त्याने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याची माहिती दिली जाते. सोमवारी लेखक-गीतकार हुसैन हैदरी यांनी अभिनेत्रीचे दोन ट्विट शेअर करत लोकांना अकाउंटची तक्रार करायला सांगितले होते.
कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले हे मीम्स
तर, ट्विटरच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटले आहे, की "ट्विटरने माझे ते म्हणणे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते अमेरिकन आहेत. तपकिरी (ब्राउन) लोकांना गुलाम बनवण्याची अमेरिकन लोकांची मानसिकता असते. आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे हे ते ठरवतात. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्यांच्या सहाय्याने मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमांबद्दल बोलू शकते."