बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीएमसीने मोठे पाऊल उचलले आहे. आज मंगळवारी करीना आणि अमृता अरोरा या दोघींच्याही इमारतीत BMC कडून कोविड टेस्टिंग कॅम्प लावण्यात येणार आहेत.
करीना-अमृताच्या इमारतीत लावला जाणार कोरोना टेस्टिंग कॅम्प -बीएमसीचे वैद्यकीय पथक दोन्ही अभिनेत्रींच्या इमारतीत आरटी पीसीआर चाचणी करणार आहे. बीएमसी टीम करीना आणि अमृता अरोरा यांच्या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर ठिकाणीही सानिटायझेशन करेल. चित्रपट निर्माता करण जोहरचे घरही सानिटाइझ केले जाईल. कारण पार्टी करणच्या घरी झाली होती. तेथून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. करीना खान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये आहे. बीएमसी रोज अभिनेत्रीच्या प्रकृतीचे अपडेट घेईल.
करीना आणि अमृता अरोरा शिवाय महीप कपूर आणि सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाला आहे. चौघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. हे चौघेही एकाच गर्ल गँगमध्ये आहेत आणि सोबतच पार्टी अथवा गेट टुगेदर करतात. बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बीएमसी याबाबत खूप सावध झाली आहे. करीना कपूरच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले की ती आता बरी होत आहे.
करण जोहरच्या पार्टीतून पसरला कोरोना -माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वात पहिले सीमा खानला कोरोनाची लागण झाली. ती गेल्या 8 डिसेंबरला करण जोहरच्या घरी गट टुगेदरसाठी गेली होती. या पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोराही उपस्थित होत्या. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. 11 डिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली. यात त्या दोघीही संक्रमित आढळल्या.
एवढेच नाही, तर करीना आणि अमृता या रिया कपूरच्या घरीही एकत्रित आल्या होत्या. तेथे करिश्मा, मलाइका अरोरा, मसाबा गुप्ताही उपस्थित होत्या.