Join us

मोठी बातमी! वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये या 'खान'ची एन्ट्री, घडणार नवं युनिव्हर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:17 IST

वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमात तीनपैकी हा खान झळकणार असून सर्वांच्या आनंदाला उधाण आलंय (baby john, varun dhawan)

वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. वरुण धवन या सिनेमाच्या माध्यमातून पॉवरपॅक मारधाड करताना दिसणार आहे. वरुण धवनची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. आता नुकतीच या सिनेमाबद्दल एक अपडेट समोर येतेय. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. 'बेबी जॉन' सिनेमात तीन खान्सपैकी सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दमदार कॅमिओ करताना दिसणार आहे.

सलमान-वरुण 'बेबी जॉन'मध्ये एकत्र

वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन'चा घोषणा टिझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. टिझरमध्ये वरुण धवन तगडी मारधाड करताना दिसला. शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीने 'बेबी जॉन' सिनेमाची निर्मिती केलीय. आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार  'बेबी जॉन' मध्ये सलमान खान विशेष कॅमिओत झळकणार आहे. या कॅमिओत सलमान 'सिकंदर'च्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान सध्या ए.आर.मुरगुदास यांच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूटींग करतोय. याच सिकंदरच्या रुपात सलमान 'बेबी जॉन'मध्ये वरुण धवनसोबत काम करण्याची शक्यता आहे.

सिकंदर-बेबी जॉन आमनेसामने

अशाप्रकारे 'बेबी जॉन'मध्ये सलमान - वरुण धवन एकत्र येणार आहेत. यशराज फिल्मसने जसं 'स्पाय युनिव्हर्स' तयार केलंय तसंच 'बेबी जॉन' आणि 'सिकंदर' यानिमित्ताने एक वेगळंच युनिव्हर्स तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलमान खानने काहीच दिवसांपूर्वी 'सिकंदर' सिनेमाची घोषणा केली. या सिनेमातील सलमानचा फर्स्ट लूकही समोर आला होता. मोठ्या पडद्यावर सलमान-वरुण एकत्र आल्यावर मनोरंजनाचा धमाका होणार, यात शंका नाही. 'बेबी जॉन' सिनेमा २५ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :वरूण धवनसलमान खानबॉलिवूड