Dhadkan Movie Song : अभिनेता अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी तसेच सुनील शेट्टी या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना 'धडकन' चित्रपटाची दखल घ्यायला भाग पाडलं. चित्रपटातील कथानकापेक्षा त्यातील गाणी ही त्याकाळी सुपरहिट ठरली. 'दिल ने ये कहा यें दिल से ...' हे गाणं आजही चाहत्यांच्या तोंडपाठ आहे. पण हेच लोकप्रिय गाणं शूट करण्यासाठी त्यावेळेस साडे चार वर्षांचा कालावधी लागला होता, असं सांगितलं जातं.
साल २००० मध्ये 'धडकन' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी तसेच महिमा चौधरी मुख्य भूमिकेत होते.
'धडकन' चित्रपटातील 'मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा...,' हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये फेमस आहे. या डायलॉगप्रमाणे त्यातील सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. त्यातील 'दिल नें ये कहॉं हैं दिल सें' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. पण या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी जवळपास साडे चार वर्षांचा कालावधी लागला होता.
गाण्याच्या शुटिंगसाठी लागली साडे चार वर्ष-
'धडकन' मधील हे गाणं वेगेवेगळ्या ठिकाणी चित्रीत करण्यात आलं. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्या मुलाखतीत तिने सांगितलं की, या चित्रपटाचं शूटिंग ५ वर्षात पूर्ण झालं पण त्यातील एक गाणं शूट करण्यासाठी साडे चार वर्षे लागली होती .
पहिल्या भागाचं शूटिंग स्वित्झर्लंडमध्ये झालं-
'दिल नें ये कहा हैं दिल से...' या गाण्याचा पहिला भाग स्वित्झर्लंडमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर गाण्यातील 'कैसे आखें चार कर लू' हा भाग शूट करायला दुसऱ्या लोकेशनवर जावं लागलं. त्यामुळे गाणं वेगवेगळ्या सीन्सवर शूट केलं गेलं. त्यातच चार वर्षे उलटून गेली.
'दिल नें ये कहा हैं दिल से...' हे गाणं तेव्हा सर्वाधिक लोकप्रिय ठरलं. गायिका अल्का याग्निक आणि उदित नारायण यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला होता. शिवाय या गाण्यासाठी अलका याग्निक यांना बेस्ट प्लेबॅक सिंगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.