Join us

खरं की काय! ‘या’ पाच भारतीय सिनेमानं गिनीज बुकात नोंदवलं नाव, साधसुधं नाही कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 8:00 AM

Guinness World Records : भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. साहजिकच या सिनेसृष्टीच्या नावावर काही अनोखे विक्रमही आहेत. बॉलिवूडच्या काही सिनेमांची तर गिनीज बुकात नोंद झालेली आहे. ती सुद्धा अनोख्या  कारणांसाठी.

Guinness World Records : भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. साहजिकच या सिनेसृष्टीच्या नावावर काही अनोखे विक्रमही आहेत. बॉलिवूडच्या (Bollywood) काही सिनेमांची तर गिनीज बुकात नोंद झालेली आहे. ती सुद्धा अनोख्या  कारणांसाठी. त्यावरच एक नजर... (Bollywood Movies Made Guinness World Records)

‘बाहुली- द बिगिनींग’ अर्थात ‘बाहुबली 1’ हा चित्रपट किती गाजला, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एस. एस. राजमौली आणि प्रभासच्या या सिनेमाला जगभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.गिनीज बुकात या चित्रपटाचं नाव नोंदवलं गेलं, ते मात्र एका वेगळ्या कारणानं. होय, कोचीमधल्या युनायटेड मीडिया कंपनीनं या चित्रपटाचं सगळ्यांत मोठं म्हणजे 50 हजार स्क्वेअर फुट लांबीचं पोस्टर बनवलं होतं. यासाठी या चित्रपटाचं नाव गिनीज बुकात चढलं.

‘कहो ना प्यार है’ हा हृतिक रोशनचा डेब्यू सिनेमा. हृतिकचा पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 10 कोटींत तयार झालेल्या या सिनेमानं 66.74 कोटींचा बिझनेस केला. या चित्रपटाचं नाव गिनीज बुकात नोंदवलं गेलं. कारण काय तर, या सिनेमाला वेगवेगळ्या कॅटेगरीत तब्बल 102 अवार्ड मिळाले. हा विक्रम गिनीज बुकात नोंदवला गेला.

‘पीके’ हा आमिर खानचा तुफान गाजलेला सिनेमा. राजकुमार हिरानींच्या या सिनेमानं जगाला वेड लावलं. 2014 साली रिलीज झालेल्या या सिनेमानं भारतापेक्षाही जास्त कमाई अन्य देशांमध्ये केली होती. याचमुळे या चित्रपटाचं नाव गिनीज बुकात नोंदवण्यात आलं होतं.

सुनील दत्तचा ‘यादें’ या चित्रपटाचं नावही गिनीज बुकात नोंदवलं गेलं आहे. कारण अगदीच खास आहे. होय, या चित्रपटात फक्त सुनील दत्त हेच एकटे कलाकार आहेत. अन्य कलाकारांचा फक्त आवाज ऐकू येतो. एकटाच अ‍ॅक्टर, तोच या सिनेमाचा निर्माता आणि तोच दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाचं नाव गिनीज बुकात नोंदवलं गेलं आहे. 

‘लव्ह अँड गॉड’ नावाचा एक हिंदी सिनेमाचं नावही गिनीज बुकात नोंदवलं गेलं आहे. कारण आहे वेळ. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण हा सिनेमा बनायला तब्बल 23 वर्षे लागले. 1963 मध्ये तो बनवायला घेतला आणि 1986 साली तो बनून पूर्ण झाला. या कारणासाठी या चित्रपटाचं नाव गिनीज बुकात आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाबाहुबली