बॉलिवूडमधील काही चित्रपट हे इतके बोल्ड आहेत की, ते कुटुंबियांसोबत पाहाताना नक्कीच दहा वेळा विचार करावा लागतो. बोल्ड कटेंटमुळे अॅडल्ड हे सर्टिफिकेट मिळालेले चित्रपट टिव्हीवर लागलेले असले तर कुटुंबासोबत पाहाताना आपल्यालाच थोडेसे अवघडल्यासारखे होते. या चित्रपटातील बोल्ड दृश्य, शिव्या यांमुळे हे चित्रपट कुटुंबियांसोबत पाहाणे नक्कीच टाळलेले बरे...
देव डीदेव डी या चित्रपटात माही गिल, अभय देओल आणि कल्की कोचलिन यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट देवदासचे आधुनिक व्हर्जन असून या चित्रपटाची भाषा ही प्रचंड व्हल्गर होती तर या चित्रपटातील दृश्य देखील खूपच हॉट होती.
हेट स्टोरीहेट स्टोरी या चित्रपटाच्या चारही सिझन बोल्ड कंटेटमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटात सेक्स सीनचा अक्षरशः भडिमार आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटाच्या पहिल्या भागात निखिल द्विवेदी, गुलशन दैवैय्या यांच्या मुख्य भूमिका होत्या तर दुसऱ्या भागात जय भानुशाली आणि सुरवीन चावला झळकले होते. हेट स्टोरी 3 या चित्रपटाची तर चांगलीच चर्चा झाली होती. कारण या चित्रपटाची शर्मन जोशी, डेसी शहा, झरीन खान, डेसी शहा, करण सिंग ग्रोव्हर अशी तगडी स्टार होती. चौथ्या सिझनमध्ये करण वाही, उर्वषी रौतेला यांच्या मुख्य भूमिका होत्या.
हंटरसेक्सचा शौकीन असलेल्या एका मुलाची कथा प्रेक्षकांना हंटर या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ब्ल्यू फिल्म पाहाणे, तरुणींचा पाठलाग करणे, महिलांसोबत संबंध ठेवणे या तरुणाच्या आवडत्या गोष्टी असतात. या चित्रपटात गुलशन देवैय्या, राधिका आपटे, सई ताम्हणकर आणि वीरा सक्सेना यांच्या मुख्य भूमिका होत्या.
जिस्मजिस्म या चित्रपटाचे अनेक भाग आपल्याला पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या पहिल्या भागात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते तर दुसऱ्या भागात सनी लियोनी आणि अरुणोदय सिंह यांची जोडी जमली होती. या दोन्ही चित्रपटातील हॉट सीनची प्रचंड चर्चा रंगली होती.