बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा उद्या 9 नोंव्हेंबरला डिजिटली रिलीज होतोय. मात्र रिलीजच्या ऐन तोंडावर या सिनेमाला होत असलेला विरोध आणखी प्रखर झाला आहे. सोशल मीडियावर नेटक-यांमध्ये या सिनेमाबद्दल संताप स्पष्ट दिसतोय. सिनेमाच्या टायटलवरून सुरुवातीपासून वादात सापडलेल्या या सिनेमाबद्दलचा राग, संताप अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
अक्षय व कियाराच्या या सिनेमाचे नाव आधी ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आले. मात्र अनेकांनी या टायटलवर आक्षेप नोंदवल्यानंतर ते बदलून ‘लक्ष्मी’ असे नामकरण करण्यात आले. तरीही लोकांचे समाधान झालेले नाही. लक्ष्मी हे देवतेचे नाव आहे. त्यामुळे या नावाने सिनेमा रिलीज करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
या चित्रपटावर पैसै फुकट घालवू नका. त्यापेक्षा हा पैसा गरिब, गरजूंना दान करा,अशा आशयाचे अनेक ट्विट नेटक-यांनी केले आहेत. बनावटी लोकांना सिनेमा पाहायचा नाही, असे म्हणत एका युजरने या सिनेमाला विरोध केला आहे.
आधी अक्षयच्या या सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ होते. या टायटलला प्रचंड विरोध झाल्यानंतर मेकर्सनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे टायटल बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे टायटल दिले. पण या नव्या टायटलवरही नेटकरी समाधानी नाहीत. केवळ ‘बॉम्ब’ हटवले, मात्र ‘लक्ष्मी’ तसेच कायम ठेवले. सिनेमाच्या टायटलचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नसताना हे नाव दिले गेले, हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असे नेटक-यांनी म्हटले आहे. आम्हाला ना ‘लक्ष्मी बॉम्ब’ नाव हवे, ना ‘लक्ष्मी’ अशी मागणी नेटक-यांनी केली आहे.
लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचाही आरोपकाही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. ‘लक्ष्मी’ या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. अद्यापही लोक हाच आरोप करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. ‘लक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.
‘लक्ष्मी’या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे.