Darshan Raval New House: 'लव्हयात्री' चित्रपटातील 'चोगाडा' आणि 'इश्क विश्क रिबाउंड' मधील 'सोनी सोनी' यांसारख्या गाण्यांच्या माध्यमातून दर्शन रावल (Darshan raval) खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. आपल्या सुमधुर आवाजाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान, दर्शन रावलने अलिकडेच त्याची बेस्ट फ्रेंड धरल सुरेलियासोबत लग्नगाठ बांधून त्याच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. लग्नानंतर आता दर्शन आणि धरलने त्यांचं हक्काचं घर घेतलं आहे. नुकताच त्यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. मायानगरी मुंबईमध्ये त्याने एक स्वत: चं घर खरेदी केलं आहे.
दर्शन रावलने या नव्या घरात आपल्या पत्नीसह गृहप्रवेश केला आहे. त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने चाहत्यांना माहिती सांगितली आहे. "नवीन घर, आईने म्हटलं होतं समुद्रकिनारी एक सुंदर असं घर पाहिजे. हे घर माझ्या पत्नीने डिझाईन केलं आहे," असं कॅप्शन या पोस्टला दर्शनने दिलं आहे. या पोस्टद्वारे दर्शन-धरलने नव्या घरातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही फार छान दिसत आहेत. दोघांनीही रोमॅन्टिक अंदाजात नव्या घरात फोटोशूट केलं आहे. दर्शन रावलने सोशल मीडियावर नव्या घराबद्दल माहिती देताच त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दर्शन रावलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, दर्शन रावल हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक आहे. 'चोगाडा', 'सोनी सोनी', 'कमरियॉं', 'तेरी ऑंखो में', 'खीच मेरी फोटो' यांसारख्या सुपरहिट गाण्यांना त्याने आपला आवाज दिला आहे.